ज्येष्ठाच्या फ्लॅटची कागदपत्रे सादर करून २८ लाख हडपले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठाच्या नावे असलेल्या फ्लॅटची कागदपत्रे सादर करून कर्ज घेत त्यांच्या नावाने बनावट खाते उघडत २८ लाख रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

दर्पण जयंत ठक्कर (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. तर लुल्लानगर येथे राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लुल्लानगर येथे फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटची कागदपत्रे युनीयन बँक ऑफ इंडियाच्या विश्रांतवाडी शाखेत सादर करून दर्पण ठक्कर याने त्यावर २८ लाखांचे तारण कर्ज घेतले. तसेच ती रक्कम काढण्यासाठी त्यांच्या नावाचे बनवाट पॅनकार्ड सादर करून त्याद्वारे बनवाट खाते पुणे मर्चन्ट को ऑपरेटिव्ह बँकेत उघडले आणि २८ लाख रुपये काढून घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कर्चे करत आहेत.