आंबेगाव तालुक्यात ‘कोरोना’ संसर्गाचे 28 रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंबेगाव तालुका येथे 28 मे 2020 रोजी एकूण 15 रुग्णांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने व दिनांक 30 मे 2020 रोजी 2 रूग्णांची, दिनांक 1 जून 2020रोजी 1 रूग्णाची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना संक्रमीत रूग्णांची संख्या 28 झाली असल्याचे जुन्नर-आंबेगाव उप विभागाचे सहाय्यक जिल्हधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

त्यापैकी दिनांक 31 मे 2020 अखेर एकूण 3 रुग्ण पुणे येथून कोरोना मुक्त होऊन बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ॲक्टीव कोविड-19 रूग्णांची संख्या 25 आहे. दिनांक 28 मे 2020 रोजी प्राप्त अहवालापैकी 6 रुग्ण वडगांव काशिंबेग येथील पूर्वीच्या रूग्णांसोबत मुंबईहून आलेले होते. 1 रूग्ण वडगांव काशिंबेग येथील मुंबईहून आलेला होता. 3 रूग्ण फदालेवाडी- उगलेवाडी येथील मुंबईहून प्रवास करून आलेल्या पूर्वीच्या रूग्णांच्या हाय रिस्क संपर्क यादीतील आहेत. 1 रूग्ण शिनोली येथील पूर्वीच्या रूग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील आहे. तसेच घोडेगांव येथील 1 रूग्ण मुंबई येथून प्रवास करून आलेला असून निरगुडसर येथील रूग्णाचा सहप्रवासी होता.

त्याचबरोबर एकलहरे येथील रूग्ण मुंबई येथील प्रवास करून आलेला होता. पेठ येथील 2 रूग्ण मुंबई येथून 2 महिन्यांपूर्वी आलेचे सांगत असून त्यांच्या शेजारी घरामध्ये घाटकोपर मुंबई येथून आलेले व्यक्ती यांचा संपर्क आलेला आहे. हाय रिस्क संपर्क यादीतील सर्व व्यक्तींची पुढील चाचणी करण्यात आलेली आहे.

दिनांक 30 मे 2020 रोजी सापडलेले 2 रुग्ण हे मौजे बळती व मौजे गिरवली येथील घाटकोपर मुंबई प्रवासी असून पूर्वीच्या रूग्णांसोबत प्रवासी व नजीकचे नाते संबंधातील व हाय रिस्क संपर्कातील आहेत. दिनांक 1 जून 2020 रोजी सापडलेला 1 रूग्ण मोजे गिरवली येथे मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. हाय रिस्क संपर्क यादीतील सर्व व्यक्तींची पुढील चाचणी करण्यात आलेली आहे.

आंबेगाव तालुक्यामध्ये एकूण 12 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तसेच ॲक्टीव रुग्णांची संख्या 25 अशी आहे. त्याअनुषंगाने प्रतिबंधित क्षेत्रामधील पुढील सर्वेक्षण पथके, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा देण्यासाठी आदेश पारित करण्यात आलेले असून सेवा पुरविण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आवश्यक सर्व सीमाबंद करण्यात आल्या असून पोलिस प्रशासनासोबत इतर विभागाचे कर्मचारी यांना चेक नाक्याच्या ठिकाणी व प्रतिबंधित क्षेत्र येथील आवश्यक कामकाज करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे, असेही श्री.डुडी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like