2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा

एस.ए.आर.के.क्रिकेट अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे दुसर्‍या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत (2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket) एस.ए.आर.के.क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या सामन्यात मेधांश जाधव याच्या ९६ धावांच्या खेळीच्या
जोरावर एस.ए.आर.के.क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ९१ धावांनी पराभव केला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना एस.ए.आर.के.क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २३७ धावांचा डोंगर उभा केला.
मेधांश जाधव याने ७७ चेंडूत १० चौकारांसह ९६ धावांची खेळी केली. पार्थ स्वामी याने ७० धावा करून त्याला उत्तम साथ दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १४६ धावांवर मर्यादित राहीला. (2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket)

शौर्य देशमुख याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ७७ धावांनी सहज पराभव
केला. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना २६७ धावा धावफलकावर लावल्या. सार्थक शिंदे (८२ धावा), अंश संघवी (६१ धावा),
शौर्य देशमुख (४५ धावा) आणि सिध्दांत बाफना (३२ धावा) यांच्या फलंदाजीच्या योगदानामुळे संघाने विशाल धावसंख्या उभी केली.
याला उत्तर देताना स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १९० धावांवर आटोपला. आरूष सिंग याने ७४ धावांची एकहाती खेळी केली.
शौर्य देशमुख आणि सौम्य सोनेग्रा यांच्या चमकदार गोलंदाजीमुळे संघाचा विजय सोपा झाला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एस.ए.आर.के.क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ५ गडी बाद २३७ धावा (मेधांश जाधव ९६ (७७, १० चौकार), पार्थ स्वामी ७० (७८, ६ चौकार),
सुशिल येवोले १-३५) वि.वि. स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ९ षटकात ९ गडी बाद १४६ धावा (समिका कौशल ३५, रूद्रांक्ष रॉय २३,
प्रणव वाळके ३-२८, प्रथमेश तांबे २-११); सामनावीरः मेधांश जाधव;

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः ३० षटकात ५ गडी बाद २६७ धावा (सार्थक शिंदे ८२ (६२, १० चौकार, ४ षटकार), अंश संघवी ६१ (६१, ८ चौकार,
१ षटकार), शौर्य देशमुख ४५, सिध्दांत बाफना ३२, आरव ठाणगांवकर ३-२४) वि.वि. स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २७.१ षटकात १० गडी
बाद १९० धावा (आरूष सिंग ७४ (५२, ४ चौकार, ४ षटकार), अद्वेत कृष्णा २२, ऋषभ जोशी २२, शौर्य देशमुख ३-२१, सौम्य सोनेग्रा २-४३);
सामनावीरः शौर्य देशमुख;

Web Title : 2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | S.A.R.K.Cricket Academy, Cricket Next Academy Teams’ Victory Salute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका