शिरूर : कारेगाव येथे ‘कोरोना’बाधित रुग्ण सापडल्याने 3 KM चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

शिरूर, पोलीसनामा ऑनलाइन-  कारेगाव (ता.शिरूर) येथे करोनाबाधित रुग्ण सापडल्याने तीन कि.मीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असुन बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी भयभीत न होता आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.

कारेगाव (ता. शिरूर) येथील एका ज्येष्ठ महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल दि.१४ रोजी रात्री आला असुन पुण्यात उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने सर्व्हे सुरू केला आहे.करोनाबाधित महिलेवर सुरुवातीला येथील बाबुराव नगरमधील खासगी रुग्णालयात एक दिवस उपचार करण्यात आले होते. संबधित महिलेला उपचारासाठी दाखल केलेल्या येथील दावाखान्यातील तसेच कुटुंबातील व इतर संपर्कात आलेले असे ४५ जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाइन करण्यात आले आहे.दवाखान्यातील १८ जणांची स्वॅब तपासणीस पाठवण्यात आले आहेत तर कुटुंबातील १४ जणांची तपासणी करण्यात येणार असुन संबंधित करोनाबाधित रुग्ण हे ज्या ठिकाणी राहतात तो परिसर अतिशय दाट लोकवस्ती असून,आरोग्य विभाग व ग्रामपंचायतप्रशासनाने विशेष खबरदारी घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत.पोलिसांनी गावातील सर्व रस्ते बंद केले आहेत. आरोग्य विभागाने परिसरातील सर्व्हे सुरू केला आहे.तर ग्रामपंचायतीने गावातील परिसर निर्जंतुक औषध फवारणी करून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील पाच १६ मे ते २० मे असे पाच दिवस शिरूर शहरात जनता कर्फ्यू पाळुन बंद ठेवण्याचा निर्णय शहरातील नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने घेतला असल्याचे शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.