मोठी बातमी ! दिल्लीतील AIIMS च्या 35 डॉक्टरांना कोरोना; अनेकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला होता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. अनेक निर्बंध घालूनही रुग्णसंख्या अपेक्षित अशी आटोक्यात येत नाही. तर दुसरीकडे याच कोरोना व्हायरसमुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टर्स कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे यातील काही डॉक्टरांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे दोन डोसही घेतले आहेत.

राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गंगाराम रुग्णालयानंतर आता एम्स रुग्णालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टरांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यामध्ये ज्युनिअर, सिनिअर, स्पेशालिस्ट यांच्यासह इतर डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये गंभीर लक्षणे नसून, सौम्य लक्षणे आहेत. यातील काही डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, कोरोनाबाधित आढळलेल्या सर्वाधिक डॉक्टरांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला होता. या डॉक्टरांसह 50 पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये 15 जण हाडासंबंधित विभागातील कर्मचारी आहेत. असे असले तरीही याबाबतची अधिकृत माहिती दिली गेली नाही.

गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरही कोरोनाबाधित

दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर्सना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील 5 जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर इतर काही डॉक्टर्स होम आयसोलेशनमध्ये आहेत.