3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; कल्याण इलेव्हन, लिजंड्स स्पोर्ट्स क्लब संघ उपांत्य फेरीत !!

पुणे : 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत कल्याण इलेव्हन आणि लिजंड्स स्पोर्ट्स क्लब या संघांनी अनुक्रमे पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब आणि ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लब या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात केतन पासलकर याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कल्याण इलेव्हन संघाने पुणे रेंजर्सचा १६ धावांनी पराभव केला. कल्याण इलेव्हनने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२८ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये रोहीत गुगळे याने ८३ धावांची खेळी केली. चिराग शेरकर (४७ धावा) आणि केतन पासलकर (३७ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने २१२ धावांपर्यंत मजल मारली. प्रसाद कुंटे (५५ धावा) आणि स्वानंद भागवत (३५ धावा) यांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. केतन पासलकर (३-३८) आणि चिराग शेरकर (२-३५) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

प्रफुल्ल मानकर याच्या १२८ धावांच्या खेळीमुळे लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा १४६ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने २४४ धावांचा डोंगर उभा केला. प्रफुल्ल मानकर याने ५५ चेंडूत १५ चौकार आणि ८ षटकारांसह १२८ धावांची खेळी केली. हृषीकेश आगाशे याने ६९ धावांची खेळी केली. प्रफुल्ल आणि हृषीकेश यांनी दुसर्‍या गड्यासाठी ७८ चेंडूत १७५ धावांची भागिदारी केली. या आव्हानासमोर ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा डाव ९८ धावांवर गडगडला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः
कल्याण इलेव्हनः २० षटकात ९ गडी बाद २२८ धावा (रोहीत गुगळे ८३ (३९, ९ चौकार, ५ षटकार), चिराग शेरकर ४७,
केतन पासलकर ३७, अमृत अलोक ३-३२, प्रणव पवार २-४५) वि.वि. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः १९.५ षटकात १० गडी बाद
२१२ धावा (प्रसाद कुंटे ५५, स्वानंद भागवत ३५, निखील नासेरी २२, सुमित दिघे ३०, केतन पासलकर ३-३८,
चिराग शेरकर २-३५); सामनावीरः केतन पासलकर;

लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ८ गडी बाद २४४ धावा (प्रफुल्ल मानकर १२८ (५५, १५ चौकार, ८ षटकार),
हृषीकेश आगाशे ६९ (३७, १३ चौकार), विजयकुमार मामीदशेट्टी ४-२३);(भागिदारी- दुसर्‍या गड्यासाठी प्रफुल्ल आणि
हृषीकेश यांच्यात १७५ (७८) वि.वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबः १४.२ षटकात १० गडी बाद ९८ धावा
(विजयकुमार मामीदशेट्टी २८, अश्‍विन शिंदे २७, गणेश जोशी ३-११, हृषीकेश आगाशे २-६); सामनावीरः प्रफुल्ल मानकर;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lalit Patil Drugs Case | ड्रग्स माफिया ललित पाटीलचा पुणे पोलिसांना मिळाला ताबा

Pune Drug Case | ड्रग्ज रॅकेट प्रकरण : ससून आणि कारागृह प्रशासन आले ताळ्यावर, कैदी रुग्णांचे प्रमाण अचानक झाले कमी