3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

टायटन बुल्स्, लिजंड्स स्पोर्ट्स क्लब संघांची विजयी कामगिरी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament) टायटन बुल्स् आणि लिजंड्स स्पोर्ट्स क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रविण सिंग याच्या अष्टपैलू खेळीमुळे टायटन बुल्स् संघाने राईज टू प्ले इलेव्हन संघाचा १९ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना टायटन बुल्स् संघाने १९२ धावा धावफलकावर लावल्या. प्रविण सिंग याने तळातील क्रमांकावर फलंदाजी करताना १० चेंडूत ४० धावा चोपून काढल्या. त्याच्या फटकेबाजीमुळे संघाने १९० धावांचा टप्पा पार केला. या आव्हानासमोर राईज टू प्ले इलेव्हनचा डाव १७३ धावांवर संपुष्टात आला. कमलेश चौगुले याने ६८ धावांची तर, महेश शिंदे ४१ धावांची खेळी केली. प्रविण सिंग (२-२२) आणि दिपीन पांचाल (३-४४) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाचा विजय साकार केला.

सुयश भट याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने युनायटेड थंर्डझ् संघाचा ४ गडी राखून पराभव केला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना सिद्धार्थ रोमन (६५ धावा), विकास सौदांते (३३), शुरवा भादुरी (४७ धावा) आणि पलाश कोंढारे (३१ धावा)
यांच्या फलंदाजीमुळे युनायटेड थंर्डझ्ने २१३ धावांचे आव्हान उभे केले. सुयश भट याने ४४ धावांत ४ गडी बाद केले.
लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने १४.४ षटकांमध्ये आणि ६ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. यामध्ये शंतनु आठवले याने ५३ धावांचे,
विपुल खैरे (४६ धावा), अभिषेक बोधे (नाबाद ४२ धावा) आणि गिरीष कोंडे २० धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
टायटन बुल्स्ः २० षटकात ८ गडी बाद १९२ धावा (प्रविण सिंग ४० (१०, ६ चौकार), गिगी खोखर ३१, दिपीन पांचाल २५,
कमलेश पैलवान ३-४६, महेश शिंदे २-१९) वि.वि. राईज टू प्ले इलेव्हनः १८.१ षटकात १० गडी बाद १७३ धावा
(महेश शिंदे ४१, कमलेश चौगुले ६८ (४०, ८ चौकार, ४ षटकार), प्रविण सिंग २-२२, दिपीन पांचाल ३-४४); सामनावीरः प्रविण सिंग;

युनायटेड थंर्डझ्ः २० षटकात ६ गडी बाद २१३ धावा (सिद्धार्थ रोमन ६५ (४८, ८ चौकार, ३ षटकार), विकास सौदांते ३३, शुरवा भादुरी ४७,
पलाश कोंढारे ३१, सुयश भट ४-४४) पराभूत वि. लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः १४.४ षटकात ६ गडी बाद २१८ धावा
(शंतनु आठवले ५३ (२४, २ चौकार, ७ षटकार), विपुल खैरे ४६, अभिषेक बोधे नाबाद ४२, गिरीष कोंडे २०, सिद्धार्थ रोमन ३-२०);
सामनावीरः सुयश भट;

Web Title : 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | Winning performance of Titan Bulls, Legends Sports Club teams

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका