इंदापूरातील देशपांडे व्हेज जवळ कारचालकाकडील 4 लाख 60 हजार लुटले

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहरातील बाह्यवळण मार्गावरील महात्मा फुले चौक, हाॅटेल देशपांडे व्हेज नजिक, मुंबईहुन उस्मानाबादला जाणार्‍या आल्टो कार मधील कुटुंबाला चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्राच्या धाकाने मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागीने लुटल्याची घटना मंगळवार दिनांक १५ डिसेंबर २०२० रोजी पहाटेच्या सुमारास घडली असुन याबाबत अंकुश गोरोबा काळे.(वय २५) रा.आरे काॅलणी, आदर्शनगर गोरेगाव पूर्व, मुंबई ६५, व मुळ रा. उस्मानाबाद यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फीर्याद दीली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की सोमवार दि.१४ डिसेंबर रोजी रात्री ८ वा.चे सुमारास फीर्यादी हे त्यांचे आई वडिल व थोरल्या भावासह त्यांचे स्वत:चे मालकीची आल्टो कार नं.एम.एच.४७, ए.बी.२४७८ या गाडीतुन मुंबई येथुन मुळ गावी उस्मानाबादला निघाले होते. मंगळवार दि.१५ रोजी पहाटे ३ वा.चे.सुमारास गाडी इंदापूर शहरातील आतील बाजुच्या रस्त्याने बाह्यवळन मार्ग, महात्मा फुले चौकातील हाॅटेल देशपांडे हाॅटेलजवळ आल्यानंतर वडीलांना लघशंकेसाठी गाडी थांबवीली असता बाजुचे शेतातील झुडपातुन चारजण अंदाजे २५ ते ३० वयोगटातील, केस विस्कटलेले, रंगाने काळे सावळे, गावंढळ भाषा बोलणारे व अंगावर मळकट कपडे घातलेले अनोळखी इसम अचानक गाडीजवळ आले. व फीर्यादी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करून गाडीची चावी काढुन घेतली व फीर्यादी यांना गाडीतुन खाली उतरण्यास भाग पाडले.

त्यातील एकजण सडपात्तळ व अंगात लाल शर्ट घातलेला होता. तर एकाच्या गळ्यात मफलर होता. लाल शर्ट घातलेल्या इसमाने आमचेजवळ असलेल्या पैशाची मागणी केली व फिर्यादी यांना कपाळावर व हातावर शस्राने मारले. तर दुसर्‍याने फिर्यादी यांचे वडीलांना दगडासारख्या वस्तुने डोक्यात मारहाण करून त्यांचे खीशातील २० हजार रूपये व हातातील मनगटी घड्याळ किंमत एक हजार, तसेच आईचे गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मणीमंगळसुत्र जुण्या खरेदीनुसार किंमत २० हजार, व कानातील सोन्याची ७ ग्रॅम वजनाची फुले किंमत ५ हजार रूपये व फीर्यादी यांचे ड्रायव्हींग लायसन, व देना बँकेचे दोन एटीएम व एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड, व क्रेडीट कार्डसह ४ लाख ६० हजार रूपये किमतीचा माल व रक्कम बळजबरीने हीसकावुन चोरून नेल्याची फिर्याद अंकुश गोरोबा काळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.