4 अशा विचित्र गोष्टी, ज्या पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे 2020 मध्येच होऊ शकत होतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०२० ची सुरुवात नव्या उत्साहासह झाली. वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लोकांनी बरेच प्लॅन केले, पण कोरोना व्हायरसमुळे सगळ्या गोष्टींवर पाणी फेरले. जर असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. सुरुवातीला मास्क लावणे कठीण होते. पण आता हे न्यू नॉर्मल झाले आहे. जे लोक फक्त रात्र घालवण्यासाठी घरी यायचे, ते लॉकडाऊनमध्ये ३ महिने किंवा त्याहून अधिक काळ घरात राहिले. अगदी अशाच गोष्टी २०२० मध्ये घडल्या आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही असेच वाटेल की हे केवळ या वर्षातच होऊ शकते. चला तर या विचित्र गोष्टी जाणून घेऊ…

वायूमंडळातील एक तारा हरवला
आपण सर्वांनी वायुमंडळात असलेल्या तार्‍यांबद्दल ऐकले आहे. मानवांसाठी तो एक तारा आहे, परंतु वैज्ञानिकांच्या दृष्टीने तार्‍यांची हालचाल ही एक खगोलीय घटना आहे. २०२० मध्ये शास्त्रज्ञांना आढळले की एक तारा वायुमंडळातून अदृश्य होत आहे. द अटलांटिकच्या अहवालानुसार, खगोलशास्त्रज्ञांनी जवळजवळ २ दशके या ताऱ्याचा अभ्यास केला होता. ताज्या अभ्यासात वैज्ञानिकांना आढळले की, ते त्याला आता पाहू शकत नाहीत.

कोविड-१९ रुग्णाचे ब्लड सॅम्पल घेऊन पळाले माकड
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माकडांच्या एका टोळक्याने एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर धाव घेतली आणि कोविड-१९ पॉझिटिव्ह रूग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन पळाले. संबंधित अधिकारी महाविद्यालयाच्या आवारात फिरत असताना हा हल्ला झाला. या घटनेची पुष्टी करत महाविद्यालयाचे डॉ. एसके गर्ग म्हणाले की, कोरोना बाधित अशा चार रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन माकडं पळून गेली.

पेंटॅगॉनने ३ यूएफओ व्हिडिओ जारी केले
वैज्ञानिक आणि सर्वसामान्यांसाठी एलियन्स आणि यूएफओ नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. आतापर्यंत यावर बरेच चित्रपट बनले आहेत, परंतु एलियन्स आहेत की नाही याची पुष्टी झालेली नाही. पण २०२० मध्ये अमेरिकेने यूएफओ पाहिल्याचा दावा केला आहे.

पेंटॅगॉनने यूएफओ पहिल्याच व्हिडिओ प्रसिद्ध केला. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने या व्हिडिओमध्ये उड्डाण करणारे हवाई परिवहन सॉसर पाहिल्याचा दावा केला आहे. हा व्हिडिओ यूएस नेव्हीच्या वैमानिकांनी बनवल्याचे सांगितले जात आहे.

ब्लॅकहोल डोळ्यांची उघडझाप करताना दिसले
शास्त्रज्ञांसाठी गूढ असलेल्या ब्लॅकहोलने २०२० मध्ये असे काहीतरी केले, ज्यामुळे सर्वच चकित झाले. वैज्ञानिकांना ब्लॅकहोलच्या सभोवतालची चमक अदृष्य होऊन ते पुन्हा येत असल्यासारखे दिसले, जसे त्याने डोळ्यांची उघडझाप केली आहे.