बंद झालेली ‘गॅस’ सबसिडी पुन्हा मिळणार का ?; मोदी सरकार म्हणतंय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरवर (LPG) अनुदान म्हणून काही ठराविक रक्कम दिली जात होती. पण गेल्या काही महिन्यांपासून हीच सबसिडी बंद होती. आता ही सबसिडी कायमस्वरूपी बंद करण्याची तयारी मोदी सरकारकडून केली जात आहे. केंद्र सरकारकडून एक कोटी लोकांना ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या माध्यमातून यावर्षी मोफत एलपीजी गॅस कनेक्शन आणि सबसिडी दिली जाणार आहे.

अन् दुसऱ्या बाजूला सरकारकडून 40 कोटी कुटुंबांना दिली जाणारी सबसिडी बंद केली जात आहे. केंद्रीय बजेटदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, की सरकारला मागील वर्षी सबसिडीवर चालू आर्थिक वर्षादरम्यान एकूण 5.96 लाख कोटी रुपये खर्च करावे लागले. गॅस आणि तेलावर सबसिडी दिली जाते. तर दुसरीकडे सरकारने सबसिडीवर 7,567 कोटी रुपयांची वाढ केली आहे.

आता सबसिडी बंदच
घरगुती स्वयंपाकाचा गॅसवर (LPG) येत्या दिवसात सबसिडी दिली जाणार नाही. सध्या दिल्ली, मुंबई या शहरांमध्ये गॅस सिलेंडर 694 रुपयांत मिळत आहे. जर तुम्हाला मिळणारी सबसिडी बंद झाली तर तुम्हाला याच किमतीत गॅस सिलेंडर घ्यावा लागणार आहे.