आता आरोग्य सेवेचेही धिंडवडे, रुग्णांचे कपडे नसल्याने ४० शस्त्रक्रिया रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात रुग्णांना लॉण्ड्रीतून कपडे धुवून न मिळाल्याने तब्बल ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे इतकी मोठी घटना घडल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक सुट्ट्यांच्या नावाने लपवाछपवी केली जात होती. शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांचे ९० कोटी रुपये राज्य सरकारने थकवल्याने कंत्राटदारांनी सरकारी रुग्णालयांना साहित्य न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिक्षण, गृह, कृषीसह आता राज्यातील आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाल्याचे दिसत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’595d38ab-c078-11e8-9e2b-79fd66ebd40f’]

शस्त्रक्रियेदरम्यान संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णांना स्वच्छ कपडे आवश्यक असतात. ते न मिळाल्याने मुंबईतील सायन रूग्णालयात युरोलॉजी, ऑर्थोपेडिक, न्युरॉलॉजी आणि जनरल शस्त्रक्रिया विभागातील ४० शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. शस्त्रक्रियांसाठी आम्हाला तीन महिन्यांपूर्वी तारखा मिळाल्या होत्या, आता पुन्हा नवीन तारखा कधी मिळतील याची माहिती प्रशासन देत नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B071V8MZGL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6aad49e0-c078-11e8-8637-41a40d60bcdf’]

सायन रुग्णालयातील रुग्णांचे ५० टक्के कपडे प्रभादेवी येथील पालिकेच्या सेंट्रल लॉण्ड्रीमध्ये व ५० टक्के कपडे खासगी लॉण्ड्रीत धुण्यासाठी पाठवले जातात. खासगी लॉण्ड्रीचे कंत्राट जून २०१७मध्ये संपले असून त्यानंतर नवीन निविदा मागवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे खासगी लॉण्ड्रीला जाणारे कपडे सेंट्रल लॉण्ड्रीत धुण्यासाठी पाठवले जात आहेत. सेंट्रल लॉण्ड्रीत फक्त ३८ कर्मचारी असून त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असल्याने मोठ्या प्रमाणात कपडे धुणे शक्य नाही. रुग्णालयात दररोज सुमारे साडेतीन हजारांहून अधिक कपडे धुण्यासाठी लॉण्ड्रीमध्ये पाठवले जातात. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मोंडकर यांनी गणपतीच्या सुट्ट्यांमुळे लिनेन उपलब्ध होऊ न शकल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याचा दावा केला असला तरी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी कपडे धुवून न आल्यामुळे शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याची कबुली दिली आहे.

योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्या, मुख्यमंत्र्यांचा निवडणूक कानमंत्र