इजिप्तमध्ये उत्खननात सापडले  ४४०० वर्षापूर्वीचे  थडगे 

ADV
कैरो : वृत्तसंस्था – उत्खननात अनेक वेळा पुरातन काळातील शहरे सापडतात ज्यामुळे त्या ठिकाणात  वास्तवास असलेल्या लोकांचा जीवन परिचय ,संस्कृती,  घरांची बांधणी, वेशभूषा, नगररचना, आहार, मुद्रा ,रस्ते या बद्दल आपल्याला कळते सर्वात महत्वाचे म्हणजे त्या संस्कृतीचे युग (वर्ष )कळते. तसेच उत्खननातून अनेक वस्तू ही सापडतात अशाच काहीशी वस्तु इजिप्तमध्ये उत्खननात  सापडल्या आहेत.

इजिप्तच्या पुरातत्त्व संशोधकांनी पिरॅमिडजवळ ४४०० वर्षापूर्वीचे थडगे उत्खनन करून शोधले आहे . या थडग्याच्या आत रंगीबेरंगी चित्रे आणि फेरो (राजा)चे पुतळे आढळले आहेत. इजिप्तच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे एक अधिकारी मुस्तफा वजिरी यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच गेल्या काही दशकांच्या काळापासून हा एक महत्वाचा शोध आहे. असे त्यांनी सांगितले.

राजधानी कैरोच्या सक्कारा प्रांतात एक जुना पिरॅमिड आहे. त्याच्याजवळून जात असताना जमिनीतून विशिष्ट आवाज येत असे. त्यामुळे याठिकाणी जमिनीत काही तरी असावे, असे पुरातत्त्व संशोधकांना वाटत होते. त्यानुसार उत्खनन केल्यावर हे भव्य थडगे सापडले. तिथे फेरोच्या अतिशय मोठ्या आकाराचे पुतळे आढळून आले. याठिकाणी ४४०० वर्षांपूर्वी वाहत्ये नावाचा एक धर्मगुरू राहत होता. थडग्यात जी चित्रे आढळली आहेत त्यामध्ये हा वाहत्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत बसलेला दिसून येतो. याठिकाणी आणखीही काही वस्तू मिळतील, अशी अपेक्षा संशोधकांना वाटत आहे.