“४८ जागा लढू ४० जिंकू. तुम्ही तयारीला लागा” – मुख्यमंत्री

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्व 48 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देईल. मित्रपक्षांच्या जागेवरही भाजपाचेच उमेदवार असतील. त्यामुळे 48 पैकी 40 जागांवर भाजपा विजयी झाली पाहिजे. अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. लातूरमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाच्या संकल्प मेळाव्यात फडणवीस बोलत होते. युतीच्या संभ्रमात राहू नका, तुम्ही तयारीला लागा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिल्या.

तर या उलट रावसाहेब दानवे म्हणाले…
शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजप अद्यापही आग्रही असल्याचे रावसाहेब दानवे यांच्या बोलण्यातून दिसून आले आहे. शिवसेनेच्या अयोध्या मुद्द्याला भाजपचा पाठींबा आहे असे सूचक वक्तव्य करून शिवसेनेच्या नेत्यांना युतीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न हि दानवे यांनी केला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी दिल्लीत बैठक घेऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातील कामाची विभागणी करून दिली आहे.

या विभागून दिलेल्या कामाच्या निमित्तांने रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन पक्षाची बांधणी करण्याला नव्याने सुरुवात केली आहे. याच कामाचा भाग म्हणून त्यांनी धुळ्याचा दौरा केला आहे. रावसाहेब दानवे धुळ्याला आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केले. अनिल गोटे यांनी बंडाळी केली त्यामुळे धुळ्यात पक्ष शिस्त बिघडली आहे. तुमचा पक्ष अनिल गोटे यांच्यावर कार्यवाही करणार का? अशा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता आमचा पक्ष कसल्या हि पध्द्तीची कार्यवाही करणार नाही असे रावसाहेब दानवे यांनी म्हणले आहे..