पुरंदर तालुक्यातील जोडरस्त्यांसाठी ५ कोटी रुपये

पुणे- पोलीसनामा न्यूज ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील ग्रामीण जोड रस्त्यांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. यामध्ये ८ रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे करण्यात येणार असून लवकरच ही कामे सुरु करण्यात येणार आहेत. पुरंदर हवेली मतदारसंघात प्रचंड मोठ्या संख्येने रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग,राज्य मार्ग व जिल्हा मार्गांबरोबरच आता ग्रामीण रस्त्यांनाही सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.ग्रामसडक योजनेने तर शेकडो गावे एकमेकांना जोडली गेली आहेत.तालुक्यात ३१ रस्ते या योजनेतून झाले आहेत.१२१ किलोमीटरचे हे रस्ते असून या वर्षअखेरीपर्यंत हा आकडा १५० किमीचा टप्पा गाठू शकतो.

मंजूर कामांची माहिती पुढीलप्रमाणे –

१) गुरोळी ते वागदरवाडी रस्ता डांबरीकरण – ४३.२५ लक्ष

२) भिवरी ते शेरीचा मळा, होळकरवाडी शिव रस्ता डांबरीकरण – ४१.१७ लक्ष
३) दरेवाडी गावात जाणारा रस्ता डांबरीकरण – २९.६२ लक्ष
४) कोडीत बु येथील म्हस्कोबा मंदिर ते दुबईवाडी रस्ता डांबरीकरण – ५७.४१ लक्ष
५)हिवरे येथील रामवाडी बेंदवस्ती रस्ता डांबरीकरण –  ६५.३१ लक्ष
६) बोपगाव येथील गणेशवाडी खापरेवस्ती रस्ता डांबरीकरण – ६२.७९ लक्ष
७) कुंभारवळण येथील पिराची वस्ती ते गावठाण रस्ता डांबरीकरण -७४.९० लक्ष
८) दिवे ते सोनोरी रस्ता डांबरीकरण -१०४ लक्ष
या व्यतिरिक्त सासवड नारायणपूर रस्ता ते सुपे खुर्द गावात जाणारा रस्ता (१ कोटी २१ लक्ष), देवडी गावात जाणारा रस्ता (५१.५४ लक्ष), पोखर गावात जाणारा रस्ता (५७.८९ लक्ष) या कामांनाही येत्या आठवडाभरात मंजुरी मिळणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.