5 Food That Should Avoid With Curd | पावसाळ्यात दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी, पोटात तयार होईल टॉक्सिन; डायजेशनवर थेट परिणाम

नवी दिल्ली : लोकांना माहित असते की दह्यासोबत मासे खाऊ नयेत किंवा दुधासोबत मासे खाऊ नयेत. मात्र, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पावसाळ्यात दह्यासोबत खाऊ नयेत. दही अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असले तरी पावसाळ्यात काही गोष्टी दह्यात मिसळून खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. या वस्तू कोणत्या ते जाणून घेऊया (Dont Take These Things With Curd)…

दह्यासोबत काय खाऊ नये

१. चहासोबत दह्याचे सेवन-

टीओआयच्या वृत्तानुसार, चहा प्यायल्यानंतर लगेच दही खाऊ नये. यामुळे चहातील टॅनिन कंपाऊंड आणि दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड यांच्यात प्रतिक्रिया होते, ज्यामुळे पोटदुखी होऊ शकते.

२. दह्यासोबत अंडी खाणे –

दह्यासोबत अंडी खाणे देखील निषिद्ध मानले जाते. अंडी आणि दही दोन्ही प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. आयुर्वेदानुसार दोन्ही आहार विरोधी आहेत. म्हणूनच अंडी आणि दही एकत्र सेवन केल्याने नुकसान होऊ शकते.

३. माशांसोबत दह्याचे सेवन –

माशांमध्ये भरपूर प्रोटीन, अनेक प्रकारची व्हिटॅमिन, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स इत्यादी असते. तसेच दही हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. पण दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन असतात. दही आणि मासे यांचे एकत्र सेवन करणे आयुर्वेदात निषिद्ध मानले गेले आहे. दोन्हींना विरूद्ध आहार म्हटले आहे. मेडिकल सायन्समध्ये याविषयी कोणताही मोठा अभ्यास नसला तरी, असे म्हटले गेले आहे की जर एखाद्याला अ‍ॅलर्जीचा त्रास असेल तर माशासोबत दही खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

४. आंब्यासोबत दह्याचे सेवन-

दह्यासोबत आंबाही खाऊ नये. दह्यामधील लॅक्टिक अ‍ॅसिड आंब्यामध्ये असलेल्या कंपाऊंडवर प्रतिक्रिया देऊ लागते, ज्यामुळे भरपूर गॅस तयार होऊ लागतो. यामुळे पोट फुगते, पचनाचा त्रास होतो. यामुळे त्वचेवर पुरळ उठू शकते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने टॉक्सिन तयार होऊ शकते.

५. ऑयली फूडसोबत दह्याचे सेवन –

जास्त तळलेल्या गोष्टींसोबत दही खाल्ल्याने नुकसान होते. जास्त तेल किंवा तूप असलेले पराठे,
भटुरे, पुरी इत्यादींसोबत दह्याचे सेवन करू नये.
त्यामुळे पचनाचा त्रास होतो आणि दिवसभर आळस जाणवतो.

६. कांद्यासोबत दह्याचे सेवन-

कांद्याशिवाय भाजी होत नसली तरी कांदा दह्यासोबत खाऊ नये. कांदा गरम तर दही थंड आहे.
म्हणूनच दोन्ही विरुद्ध आहार आहेत. दोन्ही एकत्र खाल्ल्याने अ‍ॅलर्जी, एक्जिमा, सोरायसिस आणि रॅशेस येतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jejuri Fort Development Plan | जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन