दरोड्यातील ५ जणांना ७ वर्ष सक्तमजुरी, प्रत्येकी ५ हजार रूपये दंड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – वरखेडी उड्डाण पुलाजवळ झालेल्या दरोडा प्रकरणातील आरोपी टाल्या उर्फ राहुल गजानन थोरात, मयुर सुरेश कंडारे, सागर चिंतामण भोई, महेश प्रकाश पवार, संतोष चंद्रकांत शिंदे यांना न्यायमूर्ती उगले यांनी ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा एक वर्षांची शिक्षा सुनावली.

धुळे शहराजवळील वरखेडी उड्डाण पुलाजवळ फिर्यादी शरद भिला हेमाडे आपल्या आयशर गाडीने कोंबडीचे पिल्ले पोल्ट्री फॉर्मला घेऊन जात असताना वरखेडी उड्डाण पुलाजवळ पाच जणांनी दरोडा टाकला. त्यात शरद हेमाडे यांना चाकूचा धाक दाखवून २५०० रुपये आरोपी यांनी हिसकावले होते. तसेच गाडीचा सहचालक समाधान पाटील यांच्या कडून २०० रुपये हिसकावत असतांना नोटांचे दोन तुकडे झाले होते ते तुकडे गुन्हा कामी पोलिसांनी जप्त केले होते.

सदर दरोडा केस प्रकरणात तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक हनुमंत नाथा उगले यांनी तपास केला. सरकारी वकील अ‍ॅड. निलेश कलाल यांनी कोर्टात एकूण ९ साक्षीदार तपासले साक्षीदांकडून आरोपींची ओळख परेड सुद्धा झाली होती. साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरता व गुन्हाकामी जप्त केलेल्या नोटांच्या तुकड्यावरून न्या. उगले यांनी आरोपींना ७ वर्ष सक्तमजुरीची व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंडांची रक्कम न भरल्यास पुन्हा १ वर्षाची शिक्षा सुनावली. तसेच आरोपी टाल्या उर्फ राहुल गजानन थोरात याला मुंबई पोलीस अ‍ॅक्ट १४२ नुसार आणखीन एक वर्षाची शिक्षा सुनावली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड.राजू गुजर, अ‍ॅड. निलेश दुसाने, अ‍ॅड. राहुल यलमाने यांनी काम पाहिले व सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. निलेश कलाल यांनी काम पाहिले.

आरोग्यविषयक वृत्त –