Internet Banking Safety Tips : बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, जाणून घ्या

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सरकार देशातील डिजिटल व्यवहारांना प्रोस्ताहन देत आहे. परंतु फसवणुकीची घटना पाहता सर्वांना सावध राहणे आवश्यक बनलं आहे. ऑनलाइन बँकिंगमुळे अनेक कामं सोपी तर होतात परंतु तुमचे बँकिंगचे डिटेल लिक झाल्यास तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. माहिती चोरीचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हॅकर फ्रॉड कॉल, फ्रॉड मेसेज करुन अनेकांची फसवणूक करतात. परंतु यापासून वाचण्यासाठी काही उपाय नक्कीच आहेत. ते केल्यास तुम्ही अशा फसवणूकीपासून स्वत:ला वाचवू शकतात.

1. सर्वात आधी तर हे लक्षात ठेवला की आपल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती दुसऱ्या कोणत्याही अपरिचित व्यक्तीला देऊ नका, कारण त्यावर एक्सपायरी डेट, कार्ड नंबर, सीव्हीव्ही असतो.

ADV

2. सर्वात महत्वाचा आहे वन टाइम पासवर्ड, जो तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येतो. व्यवहार पूर्ण करताना याची आवश्यकता असते. यासाठी कधीही अपरिचित व्यक्तीला हा ओटीपी सांगू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांनी त्यांचा ओटीपी विचारत नाही.

3. क्रेडिट आणि डेबिट कार्डचे सत्यापन मूल्य असते, ज्याला सीव्हीव्ही नंबर म्हणतात. जे कार्डच्या मागच्या बाजूला असते. हा नंबर कोणाला ही सांगू नका.

4. कुठूनही पैसे खरेदी करताना एटीएममधून पैसे काढताना पिन नंबर टाकावा लागतो. याकडे लक्ष द्या की हा पिन एन्टर करताना कोणीही पाहणार नाही.

5. ऑनलाइन व्यवहारात बँकिंगचा वापर करताना आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो. महिन्या दोन महिन्याने हा बँकिंग पासवर्ड बदलल्यास फसवणूकीची समस्या टाळता येईल.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/