‘तिनं’ आय ड्रॉपद्वारे ‘विष’ देऊन 64 वर्षीय पतीला मारलं, 53 वर्षीय पत्नीला 25 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 53 वर्षीय लाना स्यू क्लेटनला माराहाण करणे आणि अन्नासोबत छेडछाड करण्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. एका इंग्रजी वृत्तानं याबाबत माहिती दिली आहे. यॉर्क काऊंटचे पोलिस याबाबत बोलताना म्हणाले, “लाना क्लेटननं हे कबुल केलं आहे की, ती पती स्टीव्हन क्लेटनला ड्रिंकमधून व्हिसीन(Eye Drop) देत होती. ती पतीला 2018 मध्ये सलग 3 दिवस व्हिसीन देऊन विष देत होती त्यानंतर विषबाधा होऊन पतीचा मृत्यू झाला असं फिर्यादीनं सांगितलं आहे.”

लाना कोर्टात बोलताना म्हणाली की, “मी स्टीव्हनच्या ड्रिंकमध्ये जाणून बुजून व्हिसीन टाकलं परंतु मला त्याला ठार नव्हतं करायचं मला फक्त त्याला अस्वस्थ करायचं होतं. मला कधीच वाटलं नव्हतं की यामुळे त्याचा जीव जाईल.”

लानावर खुनाचा आरोप असताना तिच्या वकिलानं बाजू मांडताना सांगितलं की, “लाना क्लेटन शार्लोटमध्ये व्हेटेरन्स अफेअर्स नर्स म्हणून काम करणारी चांगली व्यक्ती आहे. लाना क्लेटनवर लहानपणीच अत्याचार केले गेले होते. लष्करी तळावर तिच्यावर बलात्कार केला गेला ज्यामुळे ती पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डरनं ग्रस्त होती.”

तपासादरम्यान तिनं स्वत:ला मारण्याचा प्रयत्न केला. 2018 च्या कोर्टच्या नोंदीमध्ये असे दिसत आहे की, कपलकडे 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती होती. 64 वर्षीय स्टीव्हन क्लेटन यांची इतर मालमत्ताही 1 दशलक्ष डॉलर्सहून अधिक होती. स्टीव्हन हे फ्लोरिडातील रिटायर्ड बिजनेसमन होते.

फिर्यादीनं असं सांगितलं की, “लाना क्लेटनला माहिती होतं की, त्याला सतत व्हिसीन दिल्यानं तो ठार होईल. तिला त्याची संपत्ती मिळावी म्हणून तिनं हे सगळं केलं” असा आरोपही फिर्यादीनं केला.

न्यायाधीश पॉल बर्च क्लिटनला म्हणाले, “तुम्ही असं कसं म्हणून शकता की, तुम्ही त्याला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलं. तुम्ही त्याला 3 दिवस तसंच ठेवलंत. त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलात.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/