बकरी ईदच्या पूर्वसंध्येला 56 गोवंशीय जनावरांची सुटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नागरदेवळे येथील दर्गा दायरा परिसरात शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून 56 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. मात्र अद्यापही याचा मालक कोण, याचा सुगावा लागलेला नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

दर्गा दायरा परिसरात मोठ्या प्रमाणात गाई, बैल बांधले असल्याची गुप्त माहिती उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मिळाली. त्यावरून मिटके यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी खात्री करून छापा टाकला. यात सर्व गाई-बैलांची आता सुटका केली. त्यांची रवानगी गोशाळेत करणार असल्याची माहिती संदीप मिटके यांनी दिली.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरे आणण्यात आली होती. नगरसह श्रीरामपूर येथे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त