राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ‘हे’ सर्वोत्कृष्ट अभिनेते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा ५६ वा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची उपस्थिती होती. या सोहळ्यात भोंगा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला तर के. के. मेनन आणि मुक्ता बर्वे यांनी सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाला.

या सोहळ्याला अनेक तारकांनी आणि मोठ्या अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. तसंच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली होती.

पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचं संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा म्युझियममध्ये उभारण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी यावेळी दिली. तसंच अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर ॲवॉर्डस) कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारमार्फत करण्यात येईल. भारतात सध्या सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. ‘बॉलिवूड नगरी’ असलेल्या भारतात बेली पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहेत. मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास याकडे आशियातले केंद्र म्हणून पाहता येईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

पुरस्कार- पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट कथा – सुधाकर रेडी (नाळ)

सर्वोत्कृष्ट पटकथा – शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा )

सर्वोत्कृष्ट संवाद – विवेक बेळे (आपला माणूस)

सर्वोत्कृष्ट गीत – संजय पाटील (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट संगीत – राजेश सरकाटे (मेनका उर्वशी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – विजय गवंडे (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – ऋषिकेश रानडे (व्हॉट्सअप लग्न)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – प्रियंका बर्वे (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – उमेश जाधव (मेनका उर्वशी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – स्वानंद किरकिरे (चुंबक )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – छाया कदम (न्यूड )

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – फिरोज शेख (तेंडल्या)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री – गौरी कोठवदे (पुष्पक विमान)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती – शांताई मोशन पिक्चर्स (बंदीशाला)

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन – सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर (तेंडल्या)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – के. के. मेनन (एक सांगायचंय… अनसेड हार्मनी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मुक्ता बर्वे (बंदिशाळा)

सर्वोत्कृष्ट चित्रपट – (भोंगा)