JDU चे 6 आमदार BJP मध्ये सामील, RJD चे ट्विट – ‘नितीश कुमार यांना मिळाले ख्रिसमस गिफ्ट’

पाटणा : अरुणाचल प्रदेशमध्ये जनता दल युनायटेड (जेडीयु) ला मोठा झटका बसला आहे. येथे जेडीयूचे सातपैकी सहा आमदार भाजपात सामील झाले आहेत. अरुणाचल प्रदेश पंचायत आणि नगर परिषद निवडणुक निकालांची घोषणा आणि जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या एक दिवस अगोदर ही बातमी समोर आली आहे. या प्रकरणात मीडियाच्या प्रश्नांवर बिहारचे सीएम नितीश कुमार यांनी म्हटले की, ते लोक गेले आहेत, ही गोष्ट मी त्यांच्याशी मीटिंग केल्यानंतरच सांगू शकतो.

जेडीयूच्या या आमदारांनी बदलले पारडे
अरुणाचल प्रदेश विधानसभाद्वारे जारी बुलेटिननुसार, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) च्या लिकाबाली मतदारसंघाचे आमदार करदो निग्योर सुद्धा भाजपामध्ये गेले आहेत. बुलेटिननुसार, रमगोंग विधानसभा मतदारसंघाचे तालीम तबोह, चायांग्ताजोचे हेयेंग मंग्फी, तालीचे जिकके ताको, कलाक्तंगचे के दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिलाचे डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकु मतदारसंघाचे आमदार कांगगोंग टाकू भाजपामध्ये गेले आहेत.

जेडीयूने दोन आमदारांना पाठवली होती नोटीस
जद(यू) ने 26 नोव्हेंबरला सियनग्जू, खर्मा आणि टाकू यांना ‘पार्टी विरोधी’ हालचाली केल्याने कारणे दाखवा नोटीस जारी केली होती आणि त्यांना निलंबित केले होते. या जद (यू) च्या सहा आमदारांनी यापूर्वी पक्षाचे वरिष्ठ सदस्यांना कथित प्रकारे न सांगता तालीम तबोह यांना आमदार गटाचे नेते निवडले होते. पीपीए आमदाराला सुद्धा प्रादेशिक पक्षाने या महिन्याच्या सुरूवातीला निलंबित केले होते. अरुणाचल प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बीआर वाघे यांनी म्हटले की, पार्टीत सामील होण्याचे त्यांचे पत्र आम्ही स्वीकारले आहे.

जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्यापासून
जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक उद्यापासून पाटणा येथे सुरू होत आहे. 26 डिसेंबरला राष्ट्रीय पदाधिकारी तसेच 27 ला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे.