६ हजार कर्णबधीरांना श्रवणयंत्रांचे वाटप…

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन – पुण्यातील म्हाळुंगे – बालेवाडी येथे १८ जिल्ह्यातील ६ हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,  स्टारकी हिअरिंग फौंडेशन, टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर. एस. व्हि. एज्युकेशनल अँड चॅरिटेबल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अपंग आयुक्त कल्याण आयुक्तालयाच्या सहकार्याने  श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने श्रवणयंत्र वाटप करण्याच्या या उपक्रमाचा जागतिक रेकॉर्ड ठरेल,अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

हैद्राबादहून पुण्यात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या इंजिनिअरला अटक

सदर श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम हा येत्या शुक्रवारी २६ ऑक्टोबरला सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. इतकेच नाही तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडणार असल्याचे सुळे यांनी नमूद केले. याप्रसंगी अपंग आयुक्त कल्याण विभागाचे उपयुक्त नितीन ढगे, डॉ. कल्याणी मांडके, स्टारकीचे सुरेश पिल्ले, प्रतीक निर्मल, विजय कानेकर हे यावेळी उपस्थित होते. विविध जिल्ह्यातील १५ हजार विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात कर्णबधीर विद्यार्थी आणि नागरिकांसाठी कॅम्प घेण्यात आले आहेत. त्याठिकाणी ४० ते ६० टक्के कर्णबधीर असलेल्याना हे यंत्र बसविण्यात येणार आहे. एका यंत्राची किंमत २५ हजार रुपये आहे.

सुळे म्हणाल्या की, या कार्यक्रमासाठी संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. एकाचवेळी ६ हजार लोकांना श्रवण यंत्र बसविण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व टीम सज्ज असल्याचेही त्यांचे सांगितले.

साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू

डॉ. कल्याणी मांडके यांनी सांगितले की, केवळ श्रवणयंत्र देऊन चालत नाही. त्यांच्या बॅटरी चार्जिंग, यंत्रांचे मॅपिंग या सेवाही दिल्या जातात. श्रवणयंत्र बिघडले तर नवीन उपलब्ध करून दिले जाते. तसेच यंत्रे बसविल्यानंतर संबंधित कर्णबधीर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची भाषा, वाचा आणि तदनुषंगिक बाबींचा लाभार्थ्यात होत जाणाऱ्या विकासाचा आढावा देखील घेण्यात येतो.