आश्चर्य ! सहाशे वर्षांपूर्वीची मशीद तीन भागात तोडून केली स्थलांतरित

तुर्कस्तान : वृत्तसंस्था – मानवाने प्रगतीच्या बळावर अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. महाराष्ट्रात हि धरणाच्या विकास कामासाठी देवांची मंदिरे स्थलांतरित करण्यात आली आहेत. अशीच एक बाब तुर्कस्तान देशात माध्यमांच्या प्रकाश झोतात आली आहे. तुर्कस्तान मधील एका भागात धरणाच्या भिंतीच्या लोकेशनवर सहाशे वर्षांपूर्वीची मशीद आली. या मशिदीला तीन तुकडयांमध्ये तोडून अन्य स्थळी स्थलांतरित करण्याचा प्रकार घडला आहे.

माग काळात भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तुर्कस्तान मध्ये तर रोज मशिदी बनतात रोज तुटतात असे वक्तव्य केले होते त्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर भलतीच आग पाकड केली होती. परंतु आता तुर्कस्तान मधून हि बातमी आल्याने सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या वक्तव्याला बळ मिळाले आहे. त्यावेळी स्वामी एवढेच बोलून थांबले नव्हते तर त्यांनी आपल्या भाषणात बाबरी मशिदीचे हि अशाच प्रकारे स्थलांतर केले जावे अशी मागणी केली होती.

तुर्कस्तान मधील हसनकीफ शहरा जवळ तुर्कस्तान देशातील चौथ्या क्रमांकाचे धरण उभारण्यात येणार आहे. त्या धरणाच्या भिंतीच्या लोकेशनवर हि ६०० वर्षांपूर्वीची मशीद आली म्हणून त्या मशिदीला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मशिदीला न्यू कल्चरल पार्क फील्ड या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्या मशिदीला तीन तुकड्यात तोडण्यात आले त्यानंतर रोबोट ट्रासपोर्टरच्या माध्यमातून या मशिदीला नियोजित स्थळी हलवण्यात आले. या मशिदीचे तिन्ही तुकडे २५०० टन वजनापेक्षा अधिक होते. तर मुळ जागे पासून १.६ किलोमीटर अंतरावर या मशिदीला स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच या मशिदीला स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रोबोट ट्रासपोर्टरला ३०० चाके जोडण्यात आली होते. मशिदीला स्थलांतरित करण्याचे काम सोपे नव्हते परंतु त्याला आम्ही आवाहन पहिले आणि ते काम आम्ही करून दाखवले असे या कामात सहभागी असलेल्या लोकांनी म्हटले आहे. या मशिदीच्या स्थलांतराने हे स्पष्ट झाले आहे कि मशिदीचे स्थलांतर करण्यासाठी धर्माची हरकत नाही.