Good News ! मान्सूनपुर्वीच पुण्याच्या परिसरातील धरणांमध्ये 7 वर्षांमधील सर्वाधिक पाणीसाठा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे Pune शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला  धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून ७.८८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी मान्सूनला थोडासा उशीर झाला असला तरी, पुण्यातील Pune बहुतांशी धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. काही तासांपूर्वीच केरळात मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देशात दुष्काळाची शक्यता खूप कमी आहे. खरंतर, सर्वसाधारण मान्सून पाऊस सक्रीय होण्यापूर्वी संबंधित धरणांत इतका पाणीसाठा उपलब्ध नसतो, असं निरीक्षण जलसंपदा विभागानं नोंदवलं आहे.

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू

तौत्के आणि यास चक्रीवादळामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या या चारही धरणांत तब्बल ७.८८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या सात वर्षांच्या तुलनेत मान्सूनपूर्वी इतका पाणीसाठ कधीही उपलब्ध नव्हता.

मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे या चारही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
मागील दोन वर्षात मान्सून लांबणीवर पडला होता.
अलीकडेच भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या सुधारित अंदाजनुसार, देशात यावर्षी १०१ टक्के इतका पाऊस पडणार असल्याची सुधारित माहिती दिली आहे.
त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी धरणं रिकामी करण्याचा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. एकीकडे धरणं रिकामी करण्याचा सल्ला दिला असताना, ३ जूनपर्यंत टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांत पावणे आठ टीएमसी पाणी साठ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाचा कल लक्षात घेता, हा पाणीसाठी रिकामा करण्याची गरज आहे.

 

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर