ताज्या बातम्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना पुन्हा लागणार लॉटरी, DA नंतर आता वाढतील ‘हे’ 4 भत्ते!

नवी दिल्ली : वृत्त संस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Central Government Employees ) पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात बंपर वाढीचा (Salary Hike) मार्ग मोकळा झाला आहे. डीए वाढल्यानंतर (DA Hike) केंद्रीय कर्मचार्‍यांचे अनेक भत्ते वाढणार आहेत. (7th Pay Commission)

डीए वाढल्याने प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युटीही (Gratuity Fund) आपोआप वाढतील. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ (PF) आणि ग्रॅच्युटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशावेळी डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. (7th Pay Commission)

इतकेच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचार्‍यांचा घरभाडे भत्ता House Rent Allowance (HRA) आणि प्रवास भत्ता Travelling Allowance (TA) ही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

30 मार्च रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे नऊ महिन्यांत केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए दुपटीने वाढला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता 34 टक्के दराने डीए आणि DR मिळेल.

या घोषणेचा फायदा 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. मात्र, यामुळे सरकारवर वार्षिक 9544.50 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

दरम्यान, केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून थकबाकीसाठी सरकारवर सातत्याने दबाव आणला जात आहे.
पगार आणि भत्ता हा कर्मचार्‍यांचा हक्क असून तो थांबवता येणार नाही,
असा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court ) निर्णय असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे.

अशावेळी जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीतील डीएची थकबाकी भरण्यासाठी दबाव आहे.
यावेळी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएच्या थकबाकीबाबतही (DA Arrears) चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission after da hike central employees 4 other
allowances will increase again salary will hike may 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FIR

Back to top button