7th Pay Commission | खुशखबर ! 11.56 लाख सरकारी कर्मचार्‍यांना मोठा ‘फायदा’; लवकरच वाढून येईल ‘सॅलरी’

नवी दिल्ली : मोदी सरकारने (Modi Government) सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ (7th Pay Commission) केली आहे. यामुळे कर्मचार्‍यांची सॅलरी आणि पेन्शनमध्ये वाढ (central government employees salary and pension) होईल. 1 जानेवारी 2021 पासून 11.56 लाखापेक्षा जास्त कर्मचार्‍यांना हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) लागू करण्याच्या मागणीवर अर्थ मंत्रालयाने विचार सुरू केला आहे. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सुद्धा मंजूरीसाठी पाठवला आहे. तो लागू झाल्यानंतर 11.56 लाख कर्मचार्‍यांना मोठा फायदा (7th Pay Commission) मिळेल.

 

यांच्या सॅलरीत होईल वाढ

भारतीय रेल्वे टेक्निकल सुपरवायजर्स असोसिएशन (RRTSA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) ने हाऊस रेंट अलाऊन्स एक जानेवारीपासून 2021 लागू करण्याची मागणी केली आहे.

 

जर असे मानले की थकबाकी मिळण्यासोबतच लाखो कर्मचार्‍यांचा HRA सुद्धा वाढेल.
तर यातून प्रत्येक कर्मचार्‍याला 5400 रुपयांपासून 8100 रुपये प्रति महिना लाभ होईल.
यावरून अपेक्षा आहे की, एचआरए लागू होताच सॅलरी (7th Pay Commission) वाढून येईल.
जर पुढील महिन्यापासून हा नियम लागू झाला तर लाखोचा फायदा कर्मचार्‍यांना होऊ शकतो.

 

25 टक्केपेक्षा जास्त DA वाढताच वाढेल एचआरए

एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय लेखा आणि लेखा परीक्षा समितीचे महासचिव हरिशंकर तिवारी यांच्यानुसार,
महागाई भत्त्यात वाढीने घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TA) वाढेल.

 

सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) पे मॅट्रिक्सनुसार, प्रत्येक लेव्हलच्या कर्मचार्‍याच्या वेतनात वेगवेगळी वाढ होईल. याशिवाय हे सुद्धा म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगांतर्गत जेव्हा डीए 25 टक्केपेक्षा जास्त होईल, तेव्हा एचआरएसुद्धा वाढेल. याचा दर 8, 16, 24 टक्केने वाढून 9, 18 आणि 27 टक्के होईल.

 

किती होईल वाढ

महासचिव हरिशंकर तिवारी यांनी माहिती देत सांगितले की,
जर एखाद्याचे मूळ वेतन 30000 रुपये आहे तर त्यास सुमारे 5400 रुपये ते 8100 रुपये प्रतिमहिना लाभ मिळेल.
मात्र, घरभाडे भत्त्याची रक्कम किमान 5400 रुपये प्रतिमहिना ठरवली आहे, जी यापेक्षा कमी होऊ शकत नाही.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission big benefit to 11 lakh 56 thousand government employees salary will increase soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा