7th Pay Commission | दिवाळीसाठी 7000 रुपये वाढून येईल कर्मचार्‍यांचा पगार, मोदी सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली : 7th Pay Commission | केंद्र सरकार काही केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवाळीची भेट (diwali bonus) देणार आहे. मोदी सरकार (Modi Government) अर्धसैनिक दलांना 30 दिवसांचा दिवाळी बोनस देणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 30 दिवसांच्या वेतनाबरोबर नॉन-प्रोडक्टव्हिटी लिंक्ड बोनस (Adhoc Bonus) देण्यात येणार आहे. याचा फायदा केंद्र सरकारच्या ग्रुप C आणि ग्रुप B च्या त्या सर्व नॉन-गॅझेटेड कर्मचार्‍यांना मिळेल, जे कोणत्याही प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस अंतर्गत येत (7th Pay Commission) नाहीत.

यांना मिळेल बोनस

अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, अ‍ॅडहॉक बोनसचा फायदा केंद्रीय अर्धसैनिक दल आणि सशस्त्र दलांच्या पात्र कर्मचार्‍यांना सुद्धा मिळेल.
याशिवाय केंद्र शासित प्रदेशांच्या त्या कर्मचार्‍यांना सुद्धा याचा लाभ मिळेल, जे केंद्र सरकारच्या Emoluments पॅटर्नचे पालन करतात आणि केंद्र सरकारच्या कोणत्याही इतर बोनस (7th Pay Commission) अंतर्गत येत नाहीत.

असे होईल बोनस कॅलक्युलेशन

अ‍ॅडहॉक बोनसचा फायदा केवळ त्या कर्मचार्‍यांना मिळेल जे 31-3-2021 ला सेवेत होते आणि 2020-21 च्या दरम्यान किमान सहा महिने लागोपाठ नोकरी करत आहेत.
6 महिन्यापासून एक वर्षापर्यंत नोकरी करत असलेल्या कर्मचार्‍यांना त्याच प्रमाणात बोनस दिला जाईल.

एका वर्षात सरासरी Emoluments ला 30.4 (महिन्यात दिवसांची सरासरी संख्या) ने डिव्हाईड केले जाईल.
उदाहरणार्थ 7000 रुपयांवर 7000 × 30/30.4 = Rs 6907.89 रुपये होईल.

कॅज्युअल लेबर ज्यांनी 6 दिवसांच्या आठवड्यांतर्गत कार्यालयांमध्ये 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळापर्यंत प्रत्येक वर्षी किमान 240 दिवस काम केले आहे.
त्यांच्यासाठी अ‍ॅडहॉक बोनसची रक्कम – 1200×30/30.4 = 1184.21 रुपये होईल.

हे देखील वाचा

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?

Yes Bank Case | नीरा राडिया यांना 300 कोटींच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांचे ‘समन्स’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : 7th Pay Commission | 7th pay commission employees will get rupees 7000 more in salary in october month said modi government marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update