7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी शेवटची संधी ! अन्यथा मिळणार नाही 4,500 रुपयांचा फायदा, 31 मार्चपर्यंत आहे वेळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Central Government Employees) मार्च महिना चांगला ठरू शकतो. त्यांचा महागाई भत्ता (DA) वाढेल. थकबाकी मिळेल आणि इतर भत्तेही मिळतील. 2020 मध्ये महामारीमुळे जे कर्मचारी चिल्ड्रन एज्युकेशन अलाऊन्ससाठी Children Education Allowance (CEA) क्लेम करू शकले नाहीत, त्यांना आता शेवटची संधी आहे. विना अधिकृत कागदपत्रांशिवाय, कर्मचारी 31 मार्च 2022 पर्यंत कर्मचारी आपला CEA क्लेम करू शकतात. (7th Pay Commission)

 

केंद्रीय कर्मचार्‍यांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च भत्त्याच्या रूपात मिळतो. मात्र, कोविड महामारीमध्ये शाळा बंद झाल्यामुळे हा दावा करता आला नाही. 7 व्या वेतन आयोगा (7th Pay Commission) च्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्माचार्‍यांना दरमहा 2,250 रुपये CEA मिळतो. दोन मुलांसाठी तो 4500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

 

सेल्फ डिक्लरेशन जमा करा
DoPT ने ओएम जारी केले होते. यात म्हटले होते की, कोरोनामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना मुलांचा शिक्षण भत्ता मिळण्यात अडचणी आल्या. कारण, फी ऑनलाइन जमा केल्यानंतरही शाळेकडून एसएमएस/ई – मेलद्वारे निकाल/रिपोर्ट कार्ड पाठवले गेले नाहीत.

डीओपीटीने म्हटले की, सीईएच्या दाव्यांवर निकाल/रिपोर्ट कार्ड/फी पेमेंटचे Self declaration किंवा एसएमएस/ई – मेल प्रिंटआउटद्वारे क्लेम केला जाऊ शकतो. मात्र, ही सुविधा केवळ मार्च 2020 आणि मार्च 2021 मध्ये संपणार्‍या शैक्षणिक वर्षासाठी आहे.

किती मिळतो भत्ता ?
केंद्रीय कर्मचार्‍यांना दोन मुलांच्या Children Education Allowance मिळतो. हा भत्ता 2250 रुपये प्रति महिना आहे. दोन मुले असतील तर कर्मचार्‍यांना दरमहा 4500 रुपये मिळतात. मात्र, जर दुसरे मूल जुळे असेल तर पहिल्या अपत्यासह जुळ्या मुलांच्या शिक्षणासाठीही हा भत्ता दिला जातो. दोन शैक्षणिक कॅलेंडरनुसार, एका मुलासाठी 4500 रुपये मिळतात.

जर एखाद्या कर्मचार्‍याने अद्याप मार्च 2020 आणि मार्च 2021 साठी दावा केला नसेल, तर त्यावर दावा केला जाऊ शकतो.
अशा स्थितीत त्याच्या पगारात 4500 रुपये जोडले जातील.

 

काय आहे CEA चा नियम ?
शिक्षण भत्ता फक्त केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आहे. त्यासाठी शाळेचा दाखला आणि क्लेमची कागदपत्रे जोडावी लागतात.
शाळेकडून मिळालेल्या निकालात मूल त्यांच्या संस्थेत शिकत असून तो विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी असल्याचे लिहिलेले असते.
तसेच, त्याने कोणत्या शैक्षणिक वर्षात अभ्यास केला आहे ? सीईए दाव्यासाठी, मुलाचे रिपोर्ट कार्ड, स्वयं – साक्षांकित प्रत आणि फी पावती देखील संलग्न करणे आवश्यक आहे.

जानेवारी 2022 च्या डीए ची प्रतीक्षा
केंद्रीय कर्मचारी जानेवारी 2022 च्या महागाई भत्ताच्या वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे.
लवकरच त्याची घोषणा केली जाईल.
AICPI (All India Consumer price Index) चा आकडा 125.4 होता.
या आकडेवारीवरून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, महागाई भत्ता (Dearness Allowance news) 3 टक्क्यांनी वाढणार आहे.

सध्या, एकूण 31 टक्के दराने पेमेंट केले जात आहे.
यामध्ये आणखी 3 टक्के डीए वाढल्यास तो 34 टक्के होईल.
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission latest news today central government employees children education allowance claim before 31st march

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा