7th Pay Commission | पेन्शन-DR वर मोदी सरकारने 4 वर्षांसाठी दाखवला हिरवा झेंडा, ‘या’ लोकांना फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | नरेंद्र मोदी सरकारने (Modi Government) स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजना (SSSY) पुढील 4 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने 3,274.87 कोटी रुपयांच्या वाटपालाही मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत, स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पात्र अवलंबितांना 2025 – 26 पर्यंत पेन्शन, महागाई मदत म्हणजेच DR आणि इतर आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत देशभरात 23,566 लाभार्थी समाविष्ट आहेत.

 

सरकारने काय म्हटले :
एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सरकारने 3,274.87 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक परिव्ययासह आर्थिक वर्ष 2021 – 22 पासून 2025 – 26 साठी स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजना आणि त्यातील घटकांना 31 मार्च 2021 च्या पुढे सुद्धा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

एसएसएसवाय सुरू ठेवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयाने तयार केला होता.
पेन्शनच्या रकमेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि 15 ऑगस्ट 2016 पासून महागाई मदत देखील दिली जात आहे. (7th Pay Commission)

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission modi govt approves 3274 crore rs for continuation of freedom fighters pension scheme sssy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा