Green Tea | आपण रोज ग्रीन टी पित असाल तर सावधान, अतिसेवन ठरतंय घातक, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जर आपण ग्रीन टी (Green Tea) पित असाल तर सावधान. कारण ग्रीन टी (Green Tea) घेणार्‍यांच्या सर्वेक्षणातून ग्रीन टी पिणार्‍यांना डोकेदुखी (Headache), सुस्ती (lethargy), चिंता (Anxiety) आणि चिडचिड (Irritability) असे त्रास होऊ लागले आहेत.

 

ग्रीन टीचे (Green Tea) सेवन केल्याने वजन कमी होऊ शकतं, असा सर्वसाधारण समज आहे. पण तुम्हीही जर सतत ग्रीन टीचं सेवन करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण जास्त ग्रीन टी प्यायल्याने डोकेदुखी, सुस्ती, चिंता आणि चिडचिड आदी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. तर जाणून घेऊयात सविस्तरपणे ग्रीन-टी प्यायल्याने कोणत्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं. (Side Effects Of Green Tea).

 

झोपेची समस्या (Sleep disorder) :
ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्याने झोपेची समस्या निर्माण होते. स्वस्थ आरोग्यासाठी चांगली आणि भरपूर झोप घेणं खूप गरजेचं असत. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन योग्य प्रमाणात करावे.

 

रक्तदाब वाढतो (High Blood Pressure) ग्रीन टीमध्ये कॅफिन (Caffeine) नावाचा रासायनिक घटक असतो. मज्जातंतूला उत्तेजित करण्याचे काम या घटकाच्या सेवनाने होत असते. मात्र, ग्रीन टीचे अतिसेवन (Green Tea Overdose) केल्याने तुम्हाला उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) त्रासही होऊ शकतो. तसेच ग्रीन टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे नैराश्य (नर्व्हसनेस), चक्कर येणे (Dizziness), मधुमेह (Diabetes), बद्धकोष्ठता (Constipation) अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

लोहाची उणीव (Iron Deficiency) :
ग्रीन-टीचं सेवन जास्त प्रमाणात झाल्यास शरीरात लोहाची कमतरता भासते. याशिवाय तुमची भूकही कमी होते, त्यामुळे शरीर अशक्त होते.

 

अ‍ॅसिडिटीचा त्रास (Acidity Problem) :
रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्यास अ‍ॅसिडिटीचा (Acidity) त्रास होऊ शकतो. सकाळी नाश्त्यानंतरच ग्रीन टी प्यायला हवा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Green Tea | side effects of drinking too much green tea

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

 

Mumbai Crime | महिलेच्या ‘शीला’ची किंमत PSI ने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप ! ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

Pune Crime | पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) छापेमारी; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस व कागदपत्रे जप्त