7th Pay Commission : 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार खुशखबर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळू शकते. लवकरच मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे की नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत H1 2020 (जानेवारी 2020- जून 2020) मध्ये महाभाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.

या सर्व अटकळींना तेव्हा बळ मिळालं जेव्हा जुलै 2019 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान महागाईच्या आकड्यात 3 पॉईंटची वाढ झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांची सॅलरी 720 रुपयांपासून तर 10 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ज्या त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार ही वाढ वेगवेगळी असणार आहे.

जर महागाई भत्त्यात ही वाढ झाली तर 1.1 कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मार्चमध्ये सरकार याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातही अनेक खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान वेतनातही वाढ होईल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल होऊ शकतात.

महागाई भत्त्यात (डीएमध्ये) वाढ करण्याची घोषणा वर्षातून दोनदा केली जाते. पहिल्यांदा जानेवारी ते जूनसाठी आणि दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबरसाठी. जर महाभाई भत्त्यात वाढ झाली तर हा भत्ता 17 टक्क्यांवरून 21 टक्के होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/