7th pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 1 जुलैपासून मिळणार DA आणि DR ! ‘तो’ व्हायरल मेसेज फेक; जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन -7th pay commission | केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्या (DA) संदर्भात नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) आणि अधिकाऱ्यांची शनिवारी (दि. 26) दिल्लीत महत्वाची बैठक झाली. मात्र या बैठकीत वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकी देण्याविषयीही कोणताही ठोस निर्णय झाला नाही. या बैठकीनंतर केंद्र सरकार 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते वाढवणार असल्याच्या पोस्टस सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने अद्याप कर्मचाऱ्यांचा भत्ता किंवा थकबाकीसंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे PIB ने स्पष्ट केले आहे.

सोशय मिडियावर व्हायरल होणा-या पोस्टमध्ये केंद्रीय अर्थसचिव टी.व्ही. सोमनाथन (Union Finance Secretary TV Somnathan) यांच्या हस्ताक्षरातील एका चिठ्ठीचा दाखला दिला आहे. यात सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले भत्ते म्हणजे DA आणि DR 1 जुलैपासून पुन्हा सुरु केले जातील. तसेच हे भत्ते प्रलंबित असल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सची जमा झालेली थकबाकीही अदा केली जाईल. केंद्र सरकार 3 टप्प्यात ही थकबाकी देणार असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. त्यामुळे सरकारी कर्मचारी आनंदीत झाले होते. परंतु, काही वेळानंतर # PIB FactCheck मध्ये ही चिठ्ठी बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचा-यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : 7th pay commission | fake viral message on social media about salary components increase

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update