7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Maharashtra Government employees) एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) मिळणारी थकबाकी लवकरच देण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून (State Government) शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला आहे. यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना (government employee) थकबाकीचा दुसरा हप्ता (Second installment) लवकच देण्यात येणार आहे. maharashtra government employees will get second installment of arrears of 7th pay commission from next month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

शासनाने अधिसूचना (Notification) काढून 30 जानेवारी 2019 साव्या वेतन आयोगाची (7th Pay Commission) थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षांत, 5 समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या
भविष्य निर्वाह निधी योजनेच्या (Provident Fund Scheme) खात्यात जमा करण्याचा
आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने आदा करण्याचा निर्णय (Decision to pay retired employees in cash) घेण्यात आला आहे.
तसेच सेवानिवृत्तवेतनाच्या (Retirement pension) थकबाकीची रक्कम 5 वर्षांत,
5 समान हप्त्यांत रोखीने आदा करण्याचे (pay in cash)
24 जानेवारी 2019 आणि 1 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहेत.

 

1 जुलै 2021 रोजी तिसरा हप्ता

राज्यात कोविड-19 (Covid-19) च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती
आणि त्यामुळे राज्याच्या महसूली (State revenue) जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन
1 जुलै 2020 रोजी 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे (Second installment) पैसे देण्याच निर्णय 1 वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु आता राज्य शासकीय (Government) आणि इतर पात्र कर्मचारी (other eligible employee) आणि निवृत्ती वेतनधारकांना 1 जुलै 2021 रोजी
7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

दुसऱ्या हप्त्याची रक्कम रोख

निवृत्तीवेदनधारकांना (Retirement holder) निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या
दुसऱ्या हप्त्याची रक्कम जुलै 2021 च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने आदा करण्यात येणार आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट 2021 च्या वेतनासोबत आदा करण्यात येणार आहे.
सर्व जिल्हा परिषद (All Zilla Parishad), शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम
सप्टेंबर 2021 च्या वेतनासोबत दिली जाणार आहे.

Web Title : 7th pay commission | maharashtra government employees will get second installment of arrears of 7th pay commission from next month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission latest news | सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होणार घसघशीत वाढ, जाणून घ्या किती वाढणार तुमचा पगार