7th pay commission | राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 7th pay commission | राज्यातील लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (State Government Employee) लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्य सचिवांची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या (Maharashtra State Gazetted Officers Federation) पदाधिकाऱ्यांसोबत प्रलंबित प्रश्नांबाबत शुक्रवारी (दि.17) बैठक पार पडली. यामध्ये महागाई भत्ता (Dearness Allowance), सातवा वेतन आयोग थकबाकी (7th Pay Commission), बक्षी समिती (Bakshi Committee) वेतन त्रुटी या महत्त्वाच्या प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यसचिवांनी या सर्व विषयांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

 

मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये…

1. बक्षी समितीच्या वेतनत्रुटीबाबतच्या खंड 2 अहवाल तातडीने सादर करण्यासंदर्भात अ.मु.स. वित्त यांना सूचना केल्या

2.अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वानुसार नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय जानेवारी 2020 पासूनच पुर्वलक्षी प्रभावाने जारी करण्यात येईल.

3. शासकीय सेवेत कार्यरत पती-पत्नी एकत्रित ठेवण्याच्या धोरणानुसार, महसूल विभाग वाटप नियम 2021 च्या अधिसूचनेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याविषयी सामान्य प्रशासन विभागास निर्देश देण्यात आले.

4. सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 वर्षे (Retirement Age 60)करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करुन शासकीय धोरण ठरवण्यात येईल.

5. सातवा वेतन आयोग थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान जुलै ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील 5 टक्के दराने थकबाकी तसेच 1 जुलै 2021 पासून केंद्राप्रमाणे 11 टक्के वाढीव महागाई भत्ता याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

6. विविध खात्यांतील रखडलेल्या बढती प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत सर्व विभागांना सूचना केल्या जातील.

7. महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व विभागांना सुचना केल्या जातील.

8.राज्यात 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वांना केंद्राच्या धर्तीवर नवीन पेन्शन योजनेतील सर्व सुविधा लागू करण्याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल.

मुख्यसचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या सर्व विषयाबाबत सहानुभुतीपूर्वक विचार करुन घेऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यसचिव कार्यालयातील सहसचिव रणजित कुमार (Joint Secretary Ranjit Kumar) तसेच महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे (G.D. Kulthe), महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई (Vinod Desai), उपाध्यक्ष विष्णू फटांगरे-पाटील (Vishnu Phatangare-Patil) आदी उपस्थित होते.

Web Titel :- 7th pay commission | Millions of employees in the state will soon get great relief, know

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cash Management | सॅलरी घेणार्‍यांसाठी ‘कॅश मॅनेज’ करणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या सर्वात प्रभावी ‘या’ 10 पद्धत

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 140 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 197 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी