7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना केव्हा मिळेल 18 महिन्याचा DA एरियर? ही आहे मोठी अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | पुढील महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Employees) खुशखबर देऊ शकते. या वर्षी दुसर्‍यांदा सरकारी कर्मचार्‍यांच्या डीए (Dearness Allowance) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. महागाईचे आकडे पाहता सरकार महागाई भत्ता 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची (DA Hike) शक्यता आहे. याशिवाय सरकार कर्मचार्‍यांना थकीत डीए (DA Arrear) देऊ शकते. कोविडमुळे सरकारने कर्मचार्‍यांचा डीए 18 महिन्यांसाठी रोखून धरला होता. कर्मचार्‍यांकडून थकबाकी जम करण्याची मागणी सातत्याने होत आहे. (7th Pay Commission)

 

सध्या किती मिळत आहे डीए
कर्मचारी जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेल्या डीएची सतत मागणी करत आहेत. वृत्तानुसार, सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या खात्यात एकरकमी 1.50 लाख रुपये टाकू शकते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. 2021 पासून आतापर्यंत सरकारने डीएमध्ये 11 टक्के वाढ केली आहे. या वर्षी मार्चमध्येच डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली होती. सध्या कर्मचार्‍यांना मूळ वेतनावर 34 टक्के दराने डीए दिला जात आहे. (7th Pay Commission)

 

एकरकमी मिळेल डीए एरियर
सरकारने पुढील महिन्यात थकीत डीए जमा केल्यास वाढीव 11 टक्के रक्कम जमा करून खात्यात पैसे टाकले जातील, असे सांगितले जात आहे. जानेवारी 2020, जून 2020, जानेवारी 2021 चा महागाई भत्ता कोरोनामुळे गोठवण्यात आला होता. वृत्तानुसार आता 18 महिन्यांच्या थकबाकीवर सहमती झाली तर 11 टक्के एकरकमी एरियर दिला जाईल. कर्मचार्‍यांना त्यांच्या पगाराच्या बँडनुसार डीएची थकबाकी मिळेल.

सॅलरी स्ट्रक्चरचा भाग आहे डीए
महागाईचे आकडे लक्षात घेऊन सरकारने जुलैमध्ये डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.
सरकारी कर्मचार्‍यांना मिळणारा डीए हा त्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरचा भाग असतो.
कर्मचार्‍यांच्या राहणीमानावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून सरकार महागाईनुसार डीए वाढवते.

 

किती होईल फायदा
देशातील चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा सातत्याने जास्त राहिला आहे.
हे पाहता सरकार पुढील महिन्यात कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4 ते 5 टक्के वाढ करू शकते, असे सांगण्यात येत आहे.
एका अंदाजानुसार, जर एखाद्या कर्मचार्‍याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर त्याचा 34 टक्के दराने महागाई भत्ता 6,120 रुपये होतो.
आता तो 38 टक्के झाला तर कर्मचार्‍यांना 6,840 रुपये महागाई भत्ता मिळेल. अशाप्रकारे, त्याला वार्षिक वेतनात 8,640 रुपये जास्त मिळेल.

 

Web Title :- 7th Pay Commission | on da hike and arrear government employee get salary hike 7th pay commission update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | शिवाजीनगर येथे एकाच वेळी 6 ऑनलाईन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापे; 4.55 लाखाचा मुद्देमाल जप्त, 55 जणांवर कारवाई

 

Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)