वाशीम ते पुणे प्रवासादरम्यान आठ लाखांचे दागिने लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
वाशीम ते पुणे प्रवासा दरम्यान चोरट्यांनी आठ लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली. हा प्रकार पुण्यात आल्यानंतर उघडकीस आला. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ५७ वर्षीय महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला आणि त्यांचे पती शनिवारी (दि.५) रात्री सहाच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील मंगळुरपीर येथून खासगी बसने पुण्याकडे येत होते. प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांचे कडील असलेले ६ लाख ६७ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने आणि ९३ हजार रुपयांची रोख रक्कम असे एकूण ७ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल असेलेली बॅग चोरुन नेली. रविवारी (दि. ६) सकाळी सव्वा आठच्या सुमारास ते पुण्यात आले असता हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक आर.एस. भामरे तपास करीत आहेत.