धक्कादायक ! गुढी पाडव्याच्या दिवशीच ९ वर्षीय चिमुरडीचा बलात्कार करून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी जूहूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहु परिसरातील एका स्वच्छतागृहात मागील २ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ९ वर्षाच्या चिमूरडीचा मृतदेह सापडला असून तिची बलात्कारानंतर खून करण्यात आल्याचे समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

देवेंद्र वड्डी (३५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मृत मुलगी ही मागील २ दिवासंपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरु होता. तेव्हा तिचा मृतदेह सकाळी एका स्वच्छतागृहात मिळून आला. दोन दिवसांनी तिचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी तो ताब्यात घेऊन शवविच्धेदनासाठी पाठवून दिला आहे. बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचे वैद्यकिय तपासणी नंतर निष्पन्न झालं आहे. दरम्यान वड्डी हा याच परिसरातील राहणारा आहे. त्याच्याकडे पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यावर गुन्हा उघडकिस आला आहे. दरम्यान गुढी पाडव्याच्या दिवशीच मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading...
You might also like