योगी सरकारचा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याद्वारे ‘उन्माद’, NSA ची 120 पैकी 94 प्रकरणं हायकोर्टाकडून रद्द

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – अलाहाबाद हाय कोर्टाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टाने योगी सरकारला दणका दिला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात असल्याच्या आरोपांना बळ मिळालं आहे. NSA च्या २०१८ ते डिसेंबर २०२० मधील गुन्ह्यासंदर्भातील याचिकेवर निर्णय होता. कोर्टाने म्हटलं आहे, १२० पैकी ९४ प्रकरणं ही NSA अंतर्गत येत नाही. तर ९४ प्रकरणांसंदर्भात ३२ जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाने आदेश दिले आहे.

तसेच अलाहाबाद हाय कोर्टाने म्हटलं आहे, NSA अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हे रद्द करुन अटक करण्यात आलेल्यांची मुक्तता करण्यास सांगितलं आहे. अगदी गायच्या वधापासून ते सर्वसामान्य गुन्ह्यांसाठीही NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी काहीही विचार न करता NSA लावल्याचं निरिक्षण कोर्टाने नमूद केलं आहे. तसेच NSA अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी १/३ हून जास्त प्रकरण ही गायच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी हे अल्पसंख्याक समुदायातील आहेत. जिल्हा प्रशासनाने प्राथमिकतेच्या आधारे या व्यक्तींविरोधात गायच्या हत्येशी संबंधित गुन्हे दाखल केले होते. यापैकी ३० प्रकरणांमधील एनआयएचं कलम हटवण्याचं आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच सर्व अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना सोडून देण्यास देखील हाय कोर्टाने म्हटलं आहे.

दरम्यान, NSA च्या ६ प्रकरणांमध्ये एकाच पद्धतीचा घटनाक्रम असल्याचं दिसून आलं आहे. या गुन्ह्यांची नोंद करताना, काही अज्ञात लोकं घटनास्थळावरुन पळून गेले’ असे नमूद आहे. त्यानंतर पोलिसांवर या व्यक्तींनी हल्ला केला. पोलीसातील कर्मचाऱ्यांनी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस सुरक्षित ठिकाणी पळू लागले. या अशा परिस्थितीमुळे लोकांच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा येत असून या अशा आऱोपींमुळे राज्यातील वेगवेगळ्या भागांमधील शांतता, सामाजिक सौहार्दता आणि कायदा सुव्यवस्थाही बिघडत असल्याचं पोलिसांनी गुन्हा नोंदवताना म्हटल्याचं समोर आले आहे.

FIR कॉपी पेस्ट?
अनेक प्रकरणांमध्ये FIR जसाच्या तसा कॉपी केल्याचं समोर आलं आहे. एकूण ९ प्रकरणांमध्ये एकाच FIR च्या आधारे NSA लावण्यातआलाय. या FIR मध्ये एका अनोखळी व्यक्तीने गायच्या हत्येबाबत माहिती दिली आणि आम्ही छापा मारल्याचं पोलिसांकडून नमूद करण्यात आलं आहे. एकूण १३ प्रकरणांमध्ये शेत किंवा जंगलामध्ये गो-हत्या झाली असं म्हटलं आहे. ९ प्रकरणांमध्ये एका खासगी घराच्या सीमेमध्ये गो-हत्या करण्यात आली आहे. तसेच ५ प्रकरणांमध्ये दुकानाच्या बाहेर गो-हत्या करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.