Pimpri News : एअर होस्टेट तरुणीवर मित्राकडून बलात्कार, डेटिंग App वर झाली होती ओळख

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टिंडर ॲपवर ओळख झालेल्या मित्राने एका एअर हॉस्टेस तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने तरुणीला हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तरुणीला घरी घेऊन जाऊन बेदम मारहाण करुन बलात्कार केला. ही घटना शनिवारी (दि.26) दुपारी चार ते रात्री साडे अकराच्या दरम्यान घडला.

अभिजित सिताराम वाघ (रा. घर नं.31/ए, आस्की काम्प्युटर जवळ, तापकिर नगर चौक, काळेवाडी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 26 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एअर हॉस्टेस असून तिची आरोपी सोबत टिंडर ॲपवर ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन अभिजित याने तरुणीला दुपारी चारच्या सुमारास हिंजवडी येथील एफ. एम. एल हॉटेलवर नेले. त्या ठिकाणी तरुणीला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर त्याने तरुणीला त्याच्या घरी घेऊन गेला.

घरी गेल्यानंतर त्याने तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने त्याला विरोध केला. यावरुन संतापलेल्या अभिजितने तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन डाव्या डोळ्यावर, कानावर आणि तोंडावर मारुन जखमी केले. मारहाण केल्यानंतर आरोपीने तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला, असे पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगिता गोडे करीत आहेत.