प्रियंका गांधींच्या ‘त्या’ फोटोने ४० वर्षांपूर्वीच्या इंदिरा गांधींच्या आठवणीला उजाळा 

प्रयागराज : वृत्तसंस्था – राजकारणात नुकताच प्रवेश केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशमधील प्रयागराजपासून वाराणसी पर्यंत गंगा यात्रा सुरु केली आहे. याचदरम्यान काँग्रेसने प्रियांका गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे . त्या फोटोमध्ये ४० वर्षांपूर्वीची आठवण ताजी केली आहे . ज्यामध्ये प्रियंका गांधी दुसऱ्या इंदिरा गांधी दिसत आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे . सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे . दरम्यान प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला . इतकेच नव्हे तर , काँग्रेसच्या महासचिव पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली . ज्यादिवशी पासून प्रियंका गांधींनी राजकारणात प्रवेश केला त्यादिवशी पासून , त्यांची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत होऊ लागली आहे . याचदरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी उत्तरप्रदेशमधील प्रयागराज पासून वाराणसी पर्यंत गंगा यात्रा सुरु केली आहे .  त्यामुळे , गंगा यात्रेची सुरवात करण्याआधी प्रयागराज येथील प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली . त्यावेळी प्रियंका गांधींचा पूजा करतांनाचा एक फोटो काँग्रेसने शेअर केला आहे . ज्यामध्ये ४० वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा मिळाला आहे .  ज्यामध्ये ४० वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी पूजा केलेली दिसत आहे.

विशेष म्हणजे , काँग्रेसने ट्विट करत फोटो शेअर केला आहे . त्यामध्ये एकीकडे प्रियंका गांधी तर दुसरीकडे इंदिरा गांधी यांचा फोटो आहे . याचबरोबर रुढी आणि परंपरा कधीच बदलत नसतात , काँग्रेसने इंदिरा गांधी यांचा हनुमानाची पूजा करतानाचा फोटो टाकलेला आहे . हा फोटो २५ सप्टेंबर १९७९ रोजी काढण्यात आला आहे . तर दुसरीकडे आज प्रयागराज येथे प्रियंका गांधी यांनी हनुमानाची पूजा केल्याचा फोटो आहे . काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून प्रियंका गांधी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केलेली आहे . त्यासाठी प्रियंका नही ये आंधी है , दुसरी इंदिरा गांधी है …! अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रॅलीमध्ये दिल्या जातात . असे ट्विट केले आहे .

https://twitter.com/INCUttarPradesh/status/1107545485475090432