किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मेंदूतील ट्यूमर हा आपल्या मेंदूतील असामान्य पेशींचा एक मास किंवा वाढ आहे. मेंदूचे ट्यूमरचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. मेंदूतील काही ट्यूमर खूप सौम्य असतात. आणि काही मेंदूतील ट्यूमर कर्करोगासंबंधी असतात. ब्रेन ट्यूमर आपल्या मेंदूमध्ये सुरू होऊ शकतात किंवा आपल्या शरीराच्या इतर भागात कर्करोग सुरू होऊ शकतो. आणि आपल्या मेंदूमध्ये द्वितीयक ट्यूमर पसरू शकतो. त्यामुळे या आजाराचे जर वेळीच निदान झाले नाही. तर हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. त्यामुळे किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

सुधारित तंत्रज्ञानामुळे अनेक सर्जरी करणे आता सोपे झाले आहे. किहोल हि त्यातीलच एक सर्जरी आहे. या सर्जरीमुळे आपला मेंदू, रक्तवाहिन्या यांना धोका पोहचत नाही. त्यामुळे हि सर्जरी चांगली होऊ शकते. प्रत्येक ट्युमरसाठी हि सर्जरी योग्य ठरत नाही. प्रत्येक रुग्णाचा ट्युमर आणि त्याची जागा यानुसार त्याच्यासाठी कोणती शस्त्रक्रिया योग्य आहे. हे ठरवलं जात. आणि मगच ती शास्र्क्रिया केली जाते.

तसेच पिट्युटरी ट्युमर किंवा मेंदूच्या एखाद्या भागातील ट्युमरमुळे आपल्याला चांगले दिसत नसेल. आणि डोळ्यांच्या हालचालीवर परिणाम होत असेल, तर असे ट्युमर काढण्यासाठी ही पद्धत महत्वाची आहे.

हि सर्जरी करताना वेदना कमी होतात. तसेच जखमही कमी होते. आणि तो रुग्ण लवकर बारा होण्यास मदत होते. त्यामुळे ब्रेन ट्युमरसाठी हि सर्जरी खूप फायद्याची आहे.

फेसबुक पेज लाईक करा –