वटपोर्णिमेच्या मुहूर्तावर शहरात एका दिवसात तब्बल  १२ सोनसाखळी चोरीच्या घटना 

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

शहरातील विविध भागात 11 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. आज वट पोर्णिमा साजरी होत आहे. त्यामुळे महिला साज श्रृंगार करुन मंदिरात  पुजाअर्चा करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या दागिण्यांवर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे. मागील वर्षी देखील चोरट्यांनी या सणादिवशीच  शहरात 12  ठिकाणी महिलांच्या दागिन्यावर हात साफ केला होता. दुपार होण्याच्या अगोदरच चोरांनी तब्बल १२ सोनसाखळ्या हिसकावल्या आहेत. त्यामुळे चोरटे मागील वर्षीचे रेकाॅर्ड तोडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वटपौर्णीमेच्या दिवशी चोरट्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात धुमाकुळ घालत ५ लाख ७८ हजार २५० रुपयांचे दागिने चोरुन नेले. या चोरट्यांना अटक करुन मुद्देमाल जप्त करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.

[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8239d86-79ec-11e8-bad7-8d0210c68055′]

लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 8 वाजता पहिली सोनसाखळी चोरीची घटना घडली. त्यांनतर 8 वाजून 20 मिनिटांनी शिवाजीनगर परिसरात दुसरी घटना घडली. सांगवी परिसरात सकाळपासून तब्बल चार सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत. वाकड परिसरात देखील 9.20 च्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे. चतुश्रृंगी पोलीस स्टेशनच्या परिसरात 10 वाजण्याच्या सुमारास सोनसाखळीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. भारती विद्यापीठ परिसरात देखील सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

एेन सणासुदीच्या मुहूर्तावरच चोरट्यांनी महिलांच्या दागिण्यावर हात साफ केल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची गांभिर्याने दखल घेत पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.