त्या महिलेने घरातच पाळली होती १४ फुटी मगर आणि झाले असे काही

जकार्ता : वृत्तसंस्था – लोक कोणत्या प्राण्याला पाळतील हे काही सांगात येत नाही. वाघ, सिंह, अजगर अनेक वन्य जीव पाळल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील. वन्य जीव पाळणे नेहमीच धाेकादायक असते हे सर्वांना माहीत आहेच. कारण यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. इंडोनेशियातील एका महिलेने असे धाडस केेले. परंतु हे धाडस तिच्या जीवावर बेतले.
आणि… मगरीने केला महिलेवर हल्ला
इंडोनेशियाच्याच एका बेटावरून एक महिला मगर पाळण्यासाठी घेऊन आली. डीसी टुओ असे या महिलेचे नाव आहे. उत्तर सुलावेसीच्या मिनाहासा येथे ही 44 वर्षीय डीसी वास्तव्यास होती. डीसी रोज मगरीची काळजी घ्यायची. तिला खायला प्यायला वेळेत द्यायची. परंतु एकदा मगरीला खायला घालणे तिला भलतेच भोवले. एकदा मगरीला खाऊ घालण्यासाठी ती गेली असता मगरीने डीसीवरच हल्ला केला. या हल्ल्यात मगरीने डीसीच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले. यानंतर मात्र तिचे कुटुंब हादरून गेले. मृत डीसी अतिशय भीषण अवस्थेत आढळून आली.

मगरीवर शस्त्रक्रिया करून महिलेचे अवयव काढले बाहेर
डीसीच्या शरीराचे काही अवयव तर गायबच होते. हे पाहून सर्वच घाबरून गेले. यानंतर मात्र या मगरीला बेशुद्ध करून तिच्या पोटातून तिचा हात व अन्य काही अवयव बाहेर काढण्यात आले. मगरीच्या शरीरातून डीसीचे अवयव बाहेर काढण्यासाठी मगरीवर तब्बल 3 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. नंतर मात्र मगरीला जंगलात सोडण्यात आले.

वन्य जीव पाळणे धाेकादायक
या मगरीने डीसीवर हल्ला करून तिच्या पोटाचा भाग आणि एक हात गिळंकृत केला होता. मिनाहासाच्या पर्ल फॉर्मची डीसी ही लॅबोरेटरी प्रमुख होती शिवाय तिने घरात पाळलेली ही मगर अवैधरीत्या पाळली होती अशी माहिती स्थानिक कन्झर्व्हेशन एजन्सीचे हेंड्रिक रनडेनगन यांनी दिली. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, अशा प्रकारे वन्य जीव पाळणे किती धोक्याचे आहे ते. अशा घटना वारंवार होत असूनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. यातून सर्वांनी याेग्य तो बोध घेणे गरजेचे आहे.