…म्हणून तिच्या अंघोळीचा खर्च 1 कोटी रुपये आहे

लंडन : वृत्तसंस्था – श्रीमंत लोक काय काय वेगळे प्रयोग करतील सांगता येत नाही. या ना त्या कारणाने ते अनेकदा आपल्या शाहीपणाचा थाट लोकांना दाखवत असतात. काही सुंदर महाराण्या दुधाने अंघोळ करायच्या हे आपण ऐकले असेल. परंतु आजही अशा अनेक महिला आहेत ज्या विलासी जीवन जगतात. आणि आपला शाही थाट दाखवतात. ब्रिटनमधील अशीच एक विलासी जीवन जगणारी महिला आहे जिच्या अंघोळीचा खर्चच 1 कोटी रुपये आहे. वाचून धक्का बसला ना ? हो विश्वास वाटत नसला तरी हे मात्र खरे आहे. परंतु याला कारणही तसेच आहे. या बाईसाहेबचक्‍क शॅम्पेनने (फ्रान्समधील द्राक्ष्यांपासून बनवलेले उंची मद्य) अंघोळ करतात. एका  अब्जाधीशांची ती पत्नी आहे.

ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश मोहम्मद जहूर यांची ती पत्नी आहे जी शॅम्पेनने अंघोळ करते. कमालिया असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. त्यांना असंच विलासी जीवन जगायला आवडतं. म्हणून त्या चक्क शॅम्पेनने अंघोळ करतात. आणि तिचा अंघोळीचाच खर्च तब्बल 1 कोटी रुपये आहे.

कमालिया यांच्या अंघोळीवेळी त्यांच्या दिमतीला अनेक नोकराण्या असतात. इतकेच नाही तर अंघोळ करण्यासाठी त्या अनेक महागड्या शॅम्पेनच्या बाटल्या बाथटबमध्ये रिकाम्या करतात.  एका बाटलीची किंमत किमान 5 हजार रुपये असते आणि अशा तब्बल  18 ते 20 शॅम्पेनच्या बाटल्या त्या अंघोळीसाठी वापरतात.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की आजही इतक्या राजेशाही थाटात कोणी जीवन जगत असेल. आणखी एक चकित करणारी बाब म्हणजे, कमालियाच्या सेवेत 24 तास 22 नोकर हजर असतात. विशेष म्हणजे या नोकरवर्गांवर त्यांचा वर्षाला  2 कोटी खर्च होतात. वाचाल तेवढं आश्चर्य वाढतच जाईल कारण  कमालिया यांना हिर्‍यांच्या घड्याळींचीही आवड आहे. 40 लाखांपेक्षा जास्त किमतीची घड्याळे त्यांच्या संग्रहात आहेत. इतकेच नाही तर त्या जो गाॅगल वापरतात, त्या एका गॉगलची किंमत 4 लाख तर हँडबॅगची किंमत 90 लाख रुपये आहे. कमालिया वर्षाला पादत्राणांवरही 20 लाख रुपयांहून अधिक खर्च करतात. सर्व वाचून डोळे मोठे झाले असेल ना पण हे सगळं खरं आहे.