पोहायला गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू

पिंपरी सांडस: पोलीसनामा ऑनलाईन
उन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुणाने नदीत उडी मारल्यानंतर तो परत वर आलाच नाही. आज (शनिवारी) सायंकाळी साडेचार वाजता घटना घडली आहे. यानंतर मयत तरुणाचा मृतदेह गावकऱ्यांनी शोधून काढला आहे.

गणेश पांडुरंग गजरे (वय 23 वर्षे,पिंपरी सांडस ) असे मृत तरुणाचे नाव आहे. गणेश भिमा नदीत पोहण्यासाठी गेला होता, पोहता येत होते पण डोक्यावर पाण्यात सुर मारला त्यानंतर तो वर आलाच नाही, खूप वेळ झाला तरी वर येत नाही असे समजल्यानंतर, तो बुडाला असे लक्षात आले असता शोधाशोध केली. बऱ्याच वेळेनंतर लोकांनी गणेशचा मृतदेह शोधून बाहेर काढला.