Aadhaar Card Franchise | ‘आधार कार्ड’ची मोफत घेऊ शकता फ्रेंचायजी आणि करू शकता मोठी कमाई, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card Franchise | जर तुम्हाला आधार कार्डसंबंधी सर्व कामे माहिती असतील आणि एक आधार कार्ड सेंटर (Aadhaar Card Franchise) उघडायचे असेल आणि तुम्हाला या प्रक्रियेबाबत माहिती नसेल तर येथे आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला देत आहोत. आधार कार्ड फ्रेंचायजी मोफत घेण्याची पद्धत, यातून चांगले पैसे कसे कमवावे ते जाणून घेवूयात…

 

द्यावी लागते परीक्षा (Aadhaar Card Franchise Exam)
आधार केंद्राची फ्रेंचायजी घेण्यासाठी तुम्हाला युआयडीएआय द्वारे आयोजित परीक्षा द्यावी लागते. परीक्षा पास होणार्‍यांना आधार सर्व्हिस सेंटर उघडण्यासाठी लायसन्स दिले जाते. ही परीक्षा सर्टिफिकेशन असते. परीक्षेत पास होणार्‍या व्यक्तीला आधार एनरॉलमेंट आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागते. यानंतर तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागते.

असे करा रजिस्ट्रेशन

– आधार फ्रेंचायजीसाठी तुम्हाला लायसन्स मिळवणे खुप जरूरी आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम NSEIT (https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action) च्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला सर्वप्रथम Create New User वर क्लिक करावे लागेल.

यानंतर एक फाइल ओपन होईल. येथे कोड शेयर करण्यास सांगितले जाईल. Share Code च्यासाठी तुम्हाला https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करावे लागेल.

डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला XML File आणि Share Code दोन्ही उपलब्ध होईल.

आता पुढील स्क्रीनमध्ये तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. यामध्ये मागितलेली सर्व माहिती योग्यप्रकारे भरा. (Aadhaar Card Franchise)

तुमच्या फोनवर आणि ई-मेल आयडीवर USER ID आणि Password येईल. आता तुम्ही या आयडी पासवर्डद्वारे Aadhaar Testing and Certification च्या पोर्टल वर सहजपणे लॉगिन करू शकता.

यानंतर आपल्या समोर Continue चा पर्याय येईल, यावर क्लिक करून पुढे जा.

पुढील स्टेपमध्ये तुमच्या समोर एक फॉर्म पुन्हा आपेन होईल. येथे मागितलेली सर्व माहिती योग्यप्रकारे भरा.

यानंतर आपला फोटो आणि एक डिजिटल हस्ताक्षर वेबसाईटवर अपलोड करावे लागेल. यानंतर तुम्ही पुन्हा चेक करा की, सर्व माहिती बरोबर भरली आहे का.

या नंतर Proceed to submit form वर क्लिक करून पुढे जा.

यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. यासाठी वेबसाइटच्या Menu मध्ये जाऊन पेमेंट पर्यायावर क्लिक करा. यानंतर पेमेंट करा.

सोबतच Please Click Here to generate receipt च्या पर्यायावर क्लिक करून पेमेंटची रसीद जरूर घ्या.
परीक्षेसाठी असे बुक करा सेंटर

1 सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल.

2 आता तुम्हाला पुन्हा वेबसाइटवर लॉगइन करावे लागेल. येथे यहां Book Center वर क्लिक करून आपल्या जवळचे सेंटर निवडा.

3 यानंतर तुमची याच्याशी संबंधीत परीक्षा घेतली जाईल.

4 यानंतर तुम्हाला तारीख आणि वेळ सांगावी लागेल की केव्हा परीक्षा देण्यासाठी उपलब्ध असाल.

5 यानंतर तुम्हाला काही वेळानंतर Admit Card मिळेल. ते डाऊनलोड करून प्रिंट करा.

 

Web Title :- Aadhaar Card Franchise | franchisees can take aadhar card for free and can earn big money know how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Akkineni | राम चरणसोबतच्या Kissing सीनवर अभिनेत्री समांथाचे मोठं विधान; ‘लिपलॉक’चं सांगितलं सत्य

 

KVP | ‘या’ सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल

 

Horoscope 2022 | 2022 नववर्ष ‘या’ 6 राशींच्या लोकांसाठी लाभदायक; भरगच्च पैसा मिळण्याची शक्यता