Aadhaar Card द्वारे घरबसल्या ऑनलाइन करू शकता KYC, जाणून घ्या काय आहे पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card | बँका आणि इतर वित्तीय संस्थांसाठी ’Know Your Customer-KYC’ आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे KYC अनिवार्य केल्यानंतर, वित्तीय संस्था आणि इतर संस्थांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करणार्‍या ग्राहकांचा पत्ता आणि ओळख पडताळणी करणे आवश्यक आहे. (Aadhaar Card)

 

बँकांव्यतिरिक्त, सर्व गुंतवणूक किंवा बचत योजनांसाठी देखील केवायसी आवश्यक आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल किंवा फिक्स डिपॉझिट किंवा बँक खाते उघडायचे असेल, तर गुंतवणूक करण्यापूर्वी केवायसी करणे आवश्यक आहे.

 

जर ’Paytm’ वापरत असाल तरी सुद्धा KYC प्रक्रियेतून जावे लागेल. पेटीएम व्यतिरिक्त, इतर सर्व मोबाईल वॉलेटसाठी देखील केवायसी करणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी केवायसी केवळ मोबाइलद्वारेच करता येईल.

 

सुरुवातीला, सर्व बँकांना डिसेंबर 2005 पर्यंत ग्राहकांचे केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. यानंतर दर दोन वर्षांनी केवायसी करावे लागते. केवायसीसाठी, तुम्हाला बँकेत जाऊन तुमचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करावा लागतो. मात्र आता हे काम घरबसल्या ऑनलाइनही करता येणार आहे. (Aadhaar Card)

ऑनलाइन केवायसी कसे करावे (ऑनलाइन केवायसी)
आता केवायसी करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. केवायसी घरबसल्याही ऑनलाइन करता येते. जर घरातूनच बँक खात्याचे KYC करायचे असेल, तर त्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

 

लक्षात ठेवा आधार क्रमांक तुमच्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असावा, तरच ऑनलाइन केवायसी करता येईल.
कारण केवायसी करताना मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.

 

PM किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Nidhi) साठी KYC करायचे असल्यास pmkisan.gov.in वर जावे लागेल.
यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा. येथे आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. OTP टाकून KYC साठी अर्ज करू शकता.

 

Web Title :- Aadhaar Card | kyc update online know your customer guidelines aadhaar update online

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stocks | 2021 मध्ये सर्वात जास्त रिटर्न देणारा शेयर बनला ISGEC ! 1 लाख रुपयांचे बनवले जवळपास 4 कोटी

Earn Money | बिस्किटचा व्यवसाय करा आणि अल्पावधीतच व्हा लखपती, ताबडतोब जाणून घ्या सोपी पद्धत

Prevent Omicron Infection | ओमिक्राॅन संसर्ग टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचा मास्क वापरणं आहे सुरक्षित?