Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Solapur ACB Trap | Excise department employee in anti-corruption net while accepting bribe of 20 thousand
file photo

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शेताची मोजणी करुन देण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. सुशांत शामप्रसाद अहिरे Sushant Shamprasad Ahire (वय-36) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. जळगाव एसीबीच्या पथकाने (Jalgaon ACB Trap) ही कारवाई रविवारी (दि.8) अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धुळे येथे केली.

 

याबाबत जळगाव तालुक्यातील म्हाबळ रोड येथील 39 वर्षाच्या व्यक्तीने जळगाव एसीबीकडे (Jalgaon ACB Trap) तक्रार केली आहे. सुशांत अहिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 14 नोव्हेंबर 2022 आणि 6 जानेवारी 2023 रोजी लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय शिंदखेडा येथे त्यांनी करार करून घेतलेल्या बेटावद गावातील 4 एकर शेत जमिन गटाचे हद्द कायम करणे व पोट हिस्सा मोजणी करुन मिळावी यासाठी अती तातडीचे चलन भरुन शेत मोजणीचा अर्ज सादर केला होता.

 

हे काम करुन देण्यासाठीवरील छाननी लिपिक सुशांत अहिरे यांनी तक्रारदार यांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी 40 हजार रुपयांची मागणी करुन त्याच दिवशी 20 हजार रुपये रोख स्वीकारले. तक्रारदार यांनी उर्वरित वीस हजार रुपये काम केल्यावर देतो असे सांगितले. दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार केली.

जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (दि.6 जानेवारी) पडताळणी केली असता उर्वरित 20 हजार रुपये घेण्याची समंती सुशांत अहिरे यांनी दर्शवली. त्यानुसार रविवारी अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धुळे येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेताना अहिरे यांना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात (Dhule City Police Station)
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील (DySP Shashikant Patil),
पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav),
एन.एन. जाधव (Police Inspector N.N. Jadhav), पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील,
सुरेश पाटील, अशोक अहिरे, ईश्वर धनगर, बाळू मराठे,महाजन, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Jalgaon ACB Trap | Clerk of land record office caught in anti-corruption net while accepting bribe of Rs.20 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर