AADHAAR : मुलांना दिलं जातंय निळ्या रंगाचं ‘आधार’कार्ड, जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलिकडच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे. बऱ्याच सरकारी योजनांमध्ये आधार आवश्यक आहे. मुलांच्या प्रवेशाचा विचार केला तर तिथेही आधार कार्ड आवश्यक झाले आहे. त्यात आता यूआयडीएआय ५ वर्षाखालील मुलांना निळ्या रंगाचे आधार कार्ड देत आहे. कोणत्याही आधार सेंटरला भेट देऊन बाल आधार बनवता येते. मुलाचे बायोमेट्रिक डिटेल्स वयाच्या ५ वर्षानंतर अद्ययान्वित करावे लागतील. आपल्या मुलांचे बायोमेट्रिक डिटेल्स ७ वर्ष अद्ययान्वित न केल्यास हे कार्ड निलंबित केले जाऊ शकेल. कोणत्याही जवळच्या आधार केंद्रावर विनामूल्य अद्ययान्वित करता येते.

याबाबत यूआयडीएआयने ट्विट करून माहिती दिली आहे. युआयडीएआयने सांगितले की, ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार आवश्यक आहे. ते वयाच्या ५ वर्षांसाठी वैध असेल. ५ वर्षाखालील मुलांची बायोमेट्रिक माहिती प्राप्त केली जात नाही. दरम्यान, मुलाचे वय ५ वर्षापेक्षा जास्त झाल्यावर बायोमेट्रिक नोंदी अद्ययावत कराव्या लागतील. हे आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड नोंदणी केंद्रावर त्यांच्या नावे फॉर्म भरावे लागेल. यानंतर आपल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि आपली आधार प्रत आवश्यक असेल. दरम्यान, आधार केंद्रात आपल्याला आपले वास्तविक आधार कार्ड आणावे लागेल.

या आधारकार्डमध्ये मुलाचे आधार कार्ड त्यांच्या पालकांच्या आधार कार्डमध्ये जोडले जाते. मुलाच्या वयाचे वय ५ वर्षे झाल्यावर, बोटाचे ठसे, डोळ्यातील पडदा आणि त्याचे दहा बोटांचे फोटो आधार केंद्रात द्यावे लागतील.