Aadhaar Linking Deadline | PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजनेत असेल अकाउंट तर ताबडतोब करा ‘हे’ काम, अन्यथा फ्रीज होईल खाते

नवी दिल्ली : Aadhaar Linking Deadline | तुम्ही सुद्धा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) यासारख्या अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर आता तुमचे आधार या खात्यांना लिंक करणे अनिवार्य आहे. (Aadhaar Linking Deadline)

जर यापैकी एखाद्या योजनेत पैसे गुंतवले असतील, आणि अद्याप खात्याशी आधार लिंक केले नसेल, तर आता हे काम करा. कारण, आता हे काम करण्यासाठी फक्त २४ दिवस उरले आहेत. स्मॉल सेव्हिंग स्कीम खात्यांशी आधार लिंक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. जे लोक शेवटच्या तारखेपर्यंत आधार लिंक करणार नाहीत, त्यांची खाती नंतर गोठवली जातील. (Aadhaar Linking Deadline)

केंद्र सरकारने पीपीएफ, सुकन्या समृद्धी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि इतर पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड अनिवार्य करण्याचा आदेश ३१ मार्च रोजी जारी केला होता. यासाठी सरकारने खातेधारकांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. ही मुदत आता ३० सप्टेंबरला संपत आहे. अल्प बचत योजनांचे खातेधारक ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही आणि ज्यांनी आधारसाठी अर्ज केला आहे, ते आधार एन्रॉलमेंट स्लिप सबमिट करून त्यांचे खाते गोठवण्यापासून वाचवू शकतात.

लिंक न केल्यास काय होईल परिणाम?
३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आधार क्रमांक बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेत जमा न केल्यास अल्प बचत खाते गोठवले जाईल. आधार क्रमांक दिल्यानंतरच खाते सक्रिय होईल. एसएजी इन्फोटेकचे एमडी अनुज गुप्ता म्हणाले की, या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आधार क्रमांक निर्धारित कालमर्यादेत न दिल्यास बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते गोठवू शकते.

खाते गोठवल्यास खात्याशी संबंधित कोणतेही काम करता येणार नाही. देय व्याज खात्यात जमा होणार नाही.
पीपीएफ आणि एनएससी सारख्या योजनांमध्ये पैसे जमा करू शकणार नाही.
जर खात्याचा कालावधी पूर्ण झाला असेल तर पैसे काढता येणार नाहीत. कर्जासारख्या इतर सुविधांचाही लाभ मिळणार नाही.

आधार लिंक कसे करावे?
खातेधारकांकडे त्यांचा आधार क्रमांक खात्याशी लिंक करण्याचे अनेक पर्याय आहेत.
ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अल्प बचत खाते आहे तेथे जाऊन ते खात्याशी आधार लिंक करू शकतात.
त्यासाठी त्यांना आधारकार्ड आणि पासबुक सोबत घेऊन विहित फॉर्म भरून जमा करावा लागेल.
अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना आधार त्यांच्या खात्याशी ऑनलाइन लिंक करण्याची सुविधा देखील देतात.
खातेदार त्यांच्या बँकेच्या ऑनलाइन बँकिंग पोर्टलवर लॉग इन करून सहजपणे आधार लिंक करू शकतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | ‘…अजूनही वेळ गेलेली नाही’, रोहित पवारांचा अजित पवार गटातील आमदारांना अल्टीमेटम